---Advertisement---

केन विलियम्सनला बाद केल्यानंतर विराट कोहलीने केले ‘असे’ सेलिब्रेशन, पहा व्हिडिओ

On: रविवार, मार्च 1, 2020 6:52 PM
---Advertisement---

क्राईस्टचर्च। कालपासून(29 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात हेगली ओव्हल स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांवरच संपुष्टात आला. या डावात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला मोठ्या धावा करण्यात अपयश आले.

विलियम्सन 29 व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल यष्टीरक्षक रिषभ पंतने घेतला. विलियम्सनची ही विकेट गेल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली त्याच्या आक्रमक अंदाजात आनंद व्यक्त करताना दिसला. या दरम्यान तो काहीतरी बोलतानाही दिसला. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया आल्या आहेत.

https://twitter.com/Shrutika_05_/status/1233955943504695297

या डावात विलियम्सनची विकेट गेल्यानंतर रॉस टेलर(15), हेन्री निकोल्स(14), बीजे वॉटलिंग(0) हे न्यूझीलंडचे प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाले. पण टॉम लॅथमने 52 धावांची अर्धशतकी खेळी करत, तर काईल जेमिसनने 49 धावांची खेळी करत चांगली लढत दिली. तसेच जेमिसनने नील वॅगनरबरोबर(21) 8 व्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताला केवळ 7 धावांची आघाडी मिळाली.

या डावात भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेतल्या. तसेच जडेजाने 2 विकेट्स आणि उमेश यादवने 1 विकेट घेतली.

यानंतर दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत भारताला दुसऱ्या डावात 6 बाद 90 धावा करता आल्या आहेत. तसेच पहिल्या डावात घेतलेल्या 7 धावांच्या आघाडीमुळे सध्या भारत 97 धावांनी पुढे आहे.

त्याआधी भारताचा पहिला डाव 242 धावांवर संपुष्टात आला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---