---Advertisement---

विराटचा आरसीबीच्या कर्णधारपदाला ‘गुडबाय’; १४० सामन्यांत नेतृत्व करताना ‘अशी’ राहिली कामगिरी

On: मंगळवार, ऑक्टोबर 12, 2021 12:27 AM
Virat-Kohli
---Advertisement---

शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील एलिमिनेटरचा सामना सोमवारी (११ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ४ विकेट्सने विजय मिळवत क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला. मात्र, बेंगलोरचा आयपीएल २०२१ हंगामातील प्रवास इथेच संपला. याबरोबरोबरच विराटच्या बेंगलोर संघाच्या कर्णधारपदाचाही शेवट झाला.

विराटने आयपीएल २०२१ च्या हंगामाचा युएई टप्पा सुरु होण्यापूर्वीच तो या हंगामानंतर कर्णधारपद सोडणार असल्याचे सांगितले होते. असे असले तरी विराटने हे स्पष्ट केले आहे की तो खेळाडू म्हणून बेंगलोर संघाकडून यापुढेही खेळत राहिल.

विराटची आरसीबीचा कर्णधार म्हणून कामगिरी
विराट २००८ पासून बेंगलोरकडून खेळत आहे. आयपीएलमध्ये पहिल्या हंगामापासून आत्तापर्यंत एकाच संघाकडून खेळणारा विराट एकमेव खेळाडू आहे. त्याने २०११ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी आरसीबीचे ३ सामन्यांत डॅनिएल विट्टोरीच्या अनुपस्थितीत पहिल्यांदा नेतृत्व केले होते. त्यावेळी तो आयपीएलमधील सर्वात युवा कर्णधार बनला होता. त्यानंतर त्याने २०१३ सालापासून आरसीबीचे नियमित कर्णधारपद सांभाळले.

त्याने आत्तापर्यंत १४० आयपीएल सामन्यांत बेंगलोरचे नेतृत्व केले असून ६६ सामन्यांत विजय मिळवले आहेत. तसेच ७० सामन्यांत पराभव स्विकारले आहेत. तसेच ४ सामन्यांचे निकाल लागलेले नाहीत.

त्याच्या नेतृत्वाखाली २०१६ साली आरसीबीने आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांना सनरायझर्स हैदराबाकडून पराभव स्विकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

त्याच्या नेतृत्वाखाली २०१६ व्यतिरिक्त २०१५, २०२० आणि २०२१ या आयपीएल हंगामात बेंगलोरने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांना विजेतेपद जिंकण्यात अपयश आले.

फलंदाजीत कर्णधार म्हणून कामगिरी
विराटने बेंगलोरचा कर्णधार असताना फलंदाजीत मात्र, दमदार कामगिरी केली. त्याने १३९ डावात फलंदाजी करताना ४१.९९ च्या सरासरीने ४८७१ धावा केल्या. यामध्ये ५ शतकं आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

नेहमीच आरसीबीचा कर्दनकाळ ठरतो नरीन; बनला अशी कामगिरी करणारा एकमेवाद्वितीय गोलंदाज

विराट @४००! आयपीएलमध्ये रैना, शिखनंतर ‘असा’ पराक्रम करणारा कोहली तिसराच खेळाडू

आयपीएल लिजेंड नरीन! मॅक्सवेलला फसवत बनला ‘सबसे बडा’ गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---