---Advertisement---

‘किंग’ कोहली जुन्या रंगात परतलाय! शार्दुलच्या गोलंदाजीवर विराटचा ‘नो लूक षटकार’, चेंडू थेट स्टेडियमबाहेर

On: शुक्रवार, सप्टेंबर 24, 2021 11:12 PM
---Advertisement---

शुक्रवारी (२४ सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्जचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल २०२१ चा ३५ वा सामना रंगला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आरसीबीच्या सलामीवीरांनी त्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे सिद्ध करत दमदार फलंदाजी केली.

देवदत्त पडिकल आणि विराट कोहली या जोडीने शतकी भागीदारी करून आपल्या संघाला शानदार सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी बाद होण्यापूर्वी वेगवान अर्धशतके केली. या दरम्यान, विराट कोहलीच्या बॅटमधून दर्शकांना सुंदर फटके पाहण्यास भेटले. परंतु त्याच्या नो-लुक षटकाराने सर्वांचे मन जिंकले.

विराटने डावाच्या पाचव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर फक्त ‘नो लूक सिक्स’ मारला नाही; तर चेंडू स्टेडियमच्या बाहेर देखील पाठवला. विशेष म्हणजे, त्याने हा षटकार अजून कोणाच्या गोलंदाजीवर नव्हे तर, शार्दुल ठाकूरच्या षटकात मारला. ८२ मीटरच्या या षटकारामुळे उर्वरित संघांसाठीही धोक्याची घंटा वाजली आहे. कारण विराटही जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. विराटच्या या नो लुक षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

https://twitter.com/CowCorner9/status/1441426006577844224?s=20

तत्पूर्वी, आरसीबीच्या सलामीवीरांनी उत्कृष्ट कामगिरी करूनही त्यांचा संघ केवळ १५६ धावा करू शकला. विराट आणि पडिकल वगळता एकही फलंदाज संघासाठी धावा करू शकला नाही. विराटने ४१ चेंडूत ५३ धावा केल्या तर पडिकलने ५० चेंडूत ७० धावा केल्या. एबी डिव्हिलर्सने या सामन्यातही निराशा केली. त्याने ११ चेंडूत केवळ १२ धावा केल्या. मॅक्सवेलने ११ धावा केल्या तर टीम डेविड १ धाव करून बाद झाला. हर्षल पटेलने ३ धावा केल्या तर हसरंगा १ धाव करून नाबाद राहिला.

महत्त्वाच्या बातम्या-

आरसीबी जिंको वा सीएसके, पण त्या गोंडस चिमुकलीची विनंती पाहून पिघळेल कट्टर थाला समर्थकाचेही मन!!

देशाला अजून मिळाला नाही वनडे-कसोटीचा दर्जा, पण ‘त्याने’ जगप्रसिद्ध आयपीएल खेळत रचला इतिहास

Photo: गोड गुफ्तगू!! नाणेफेकीवेळी धोनी अन् कोहलीचा ‘ब्रोमान्स’ ठरला लक्षवेधी, चाहतेही फिदा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---