भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) आहे. नुकताच दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाने बाजी मारत मालिका २-१ ने आपल्या नावावर केली. आता १९ जानेवारी पासून दोन्ही संघांमध्ये वनडे सामन्यांचा (Sa vs Ind odi series) थरार सुरू होणार आहे. दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. जर भारतीय संघाला ही मालिका जिंकायची असेल तर, माजी कर्णधार विराट कोहली याला (Virat Kohli) चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेत खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. जो या मालिकेत भारतीय संघासाठी फायदेशीर ठरू शकतो. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकूण १७ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला ८७.८ च्या सरासरीने ८७७ धावा करण्यात यश आले आहे. यादरम्यान त्याने ३ शतक देखील झळकावले आहेत.
तसेच त्याची दक्षिण आफ्रिकेतील एकूण कामगिरी पाहिली तर, त्याने २७ सामन्यात १२८७ धावा केल्या आहेत. २०१८ मध्ये ज्यावेळी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. त्यावेळी विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला होता. त्यावेळी त्याला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. (Virat Kohli performance in South Africa)
अधिक वाचा – नेतृत्व सोडल्याचा ‘या’ पाच भारतीय कर्णधारांना झालेला फायदा; विराटसोबत असे घडणार?
भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) केला आहे. त्याने ५७ सामन्यांमध्ये २००१ धावा केल्या आहेत. यादरम्यान सचिन तेंडुलकरने ५ शतक आणि ८ अर्धशतक झळकावले आहेत, तर माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) देखील दक्षिण आफ्रिकेत धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने २९ सामन्यांमध्ये ३ शतक आणि ८ अर्धशतकासह १३१३ धावा केल्या आहेत. तसेच राहुल द्रविडने (Rahul Dravid) ३६ सामन्यांमध्ये १४ अर्धशतकांसह १३०९ धावा केल्या आहेत.
व्हिडिओ पाहा – क्रिकेटर्सलाही मागे सोडत ‘हे’ अंपायर कमावतात चिक्कार पैसा
असे आहे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील वनडे मालिकेचे वेळापत्रक :
पहिला वनडे सामना: १९ जानेवारी,२०२१ (पार्ल)
दुसरा वनडे सामना: २१ जानेवारी,२०२१ (पार्ल)
तिसरा वनडे सामना : २३ जानेवारी, २०२१( केप टाऊन)
महत्वाच्या बातम्या :
आयपीएल २०२२: अहमदाबादने निवडली आपली ‘त्रिमूर्ती’; हार्दिक-राशिदसह ‘या’ युवा फलंदाजावर लावला दाव
बुमराहसोबतच्या ‘हायव्होल्टेज’ वादानंतर आली जेन्सनची प्रतिक्रिया; म्हणाला…
हे नक्की पाहा: