न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी-20 सामना हेमिल्टनच्या सेडन पार्क येथे खेळला गेला. न्यूझीलंडने 66 धावांना हा सामना जिंकला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात न्यूझीलंडच्या 21 वर्षीय फिन ऍलेनने पदार्पण केले होते. पण त्याला साजेशी अशी कामगिरी करता आली नाही. पदार्पण सामन्यातील पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला.
काही दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० लाख रुपयांमध्ये ऍलनचा आपल्या संघात समावेश केला होता. ऍलेनचा जोश फिलिपच्याऐवजी आरसीबीमध्ये संघामध्ये समावेश केला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात त्याला अंतिम 11 जणांच्या पथकात संधी मिळाली. त्यामुळे या सामन्याद्वारे त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात त्याला सलामीला फलंदाजीची संधी मिळाली. मात्र बांगलादेशचा गोलंदाज नसुम अहमदने पहिल्याच चेंडूवर ऍलेनला त्रिपळाचीत केले. त्यामुळे पदार्पणाच्या सामन्यात ऍलेनच्या नावापुढे ‘गोल्डन डक’ची नोंद झाली.
याव्यतिरिक्त ऍलेनने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये अ दर्जाचे 20 आणि 14 टी -20 सामने खेळले आहेत. या छोट्या कारकीर्दीत त्याने पुर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जास्तकरून त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी त्याला ओळखले जाते. त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील 13 टी -20 सामन्यांत 48 च्या सरासरीने 537 धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेटही 180 पेक्षा जास्त रहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऐकलंत का! सामन्यापुर्वी लेडीज परफ्यूम लावतो बेन स्टोक्स, कारण ऐकून खदखदून हसाल
याला म्हणतात चढाओढ! रोहितने टी२०त केलेला ‘मोठा’ विक्रम, ‘या’ फलंदाजाने १५ दिवसातच काढला मोडीत
एका चुकीमुळे संकटात सापडला होता युवराज, परंतू आता होणार नाही कोणतीही कारवाई





