---Advertisement---

रिषभ पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर विराटची जहरी रिॲक्शन पाहिली का? व्हिडिओ आहे चर्चेत

On: सोमवार, जानेवारी 24, 2022 3:13 PM
Virat-Starring-At-Rishabh
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह दक्षिण आफ्रिका संघाने ही मालिका ३-० ने आपल्या नावावर केली आहे. या सामन्यात देखील भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh pant)  पुन्हा एकदा नको असलेला शॉट खेळून बाद झाला. त्यानंतर माजी कर्णधार विराट कोहलीने दिलेली रिॲक्शन (Virat Kohli reaction) सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी २८८ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना शिखर धवन बाद झाल्यानंतर रिषभ पंत फलंदाजी करण्यासाठी आला होता. शिखर धवन ज्यावेळी बाद झाला, त्यावेळी शिखर धवन आणि विराट कोहली यांच्यात महत्वपूर्ण भागीदारी झाली होती. अशातच रिषभ पंतने जबाबदारीने खेळण्याची आवश्यकता होती. परंतु तो पहिल्याच चेंडूवर स्टेप आऊट करून शॉट खेळण्याच्या नादात बाद होऊन माघारी परतला.

विराट कोहलीची रिॲक्शन होतेय व्हायरल 
रिषभ पंत फलंदाजीला येताच त्याने पहिल्याच चेंडूवर स्टेप आऊट होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच चेंडूवर तो झेलबाद होऊन माघारी परतला. रिषभ पंतचा हा बेजबाबदारपणाने खेळलेला शॉट पाहून, विराट कोहली भलताच चिडला होता. तो त्याला रागात एकटक नजरेने पाहत होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रिषभ पंतने विराट कोहलीसोबत मिळून भागीदारी केली असती, तर सामन्याचा निकाल काही वेगळा असू शकला असता.

रिषभ पंत बेजबाबदारपणे शॉट खेळून बाद होण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वी देखील तो अनेकदा अशा महत्वाच्या क्षणी असे शॉट खेळून बाद झाला आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात ज्यावेळी त्याने हा शॉट खेळला, त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये असलेले मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील भलतेच निराश झाले होते. या मालिकेत दुसऱ्यांदा तो असा शॉट खेळून बाद झाला आहे.

महत्वाच्या बातम्या :

ऋतुराजवर अन्याय झालाय?, जबर फॉर्ममध्ये असूनही खेळण्याची संधी न दिल्याने भडकले भारतीय चाहते

पप्पा विराटची झेरॉक्स कॉपी आहे ‘वामिका’, तिसऱ्या वनडेदरम्यान दिसली पहिली झलक; तुम्हीही बघा

हे नक्की पाहा:

आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---