---Advertisement---

न्यूझीलंडच्या चक्रव्यूहात अडकला भारत; दारुण पराभवानंतर कोहली म्हणाला, ‘ आता जोखीम घ्यावी लागेल’

On: सोमवार, नोव्हेंबर 1, 2021 9:17 AM
---Advertisement---

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारतीय संघाचे आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा १० गडी राखून पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने देखील भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. या दोन्ही सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग कठीण झाला आहे. नेमकं काय कारण होतं, ज्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला? याचा खुलासा स्वतः कर्णधार विराट कोहलीने सामना झाल्यानंतर केला आहे.

न्यूझीलंड संघाकडून ८ गडी राखून पराभूत झाल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने म्हटले की, “आम्ही आघाडीवर चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलो. जेव्हा आम्ही मैदानात उतरलो त्यावेळी आमची देहबोली कमकुवत होती. परंतु न्यूझीलंड संघाने शेवटपर्यंत आम्हाला दबावात ठेवले होते. जेव्हा जेव्हा आम्ही काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमचे फलंदाज बाद होऊन माघारी परतले. या तुमच्या शॉट निवडीसंदर्भातील द्विधा मनस्थितीचा परिणाम आहे. नेहमी तुम्ही हा शॉट खेळू की नको, या विचारात गुंतून जाता. या सामन्यातही असेच झाले”

तसेच विराट कोहली पुढे म्हणाला की, “जेव्हा तुम्ही भारतीय संघासाठी खेळत असता, त्यावेळी भारतीय चाहत्यांना भरपूर अपेक्षा असतात. लोक आम्हाला खेळताना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येत असतात. भारतीय संघासाठी खेळणाऱ्या सर्व खेळाडूंनी या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे आणि यातून काही मार्ग काढला पाहिजे. आम्ही या दोन्ही सामन्यात असे काहीच केले नाही. ज्यामुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. आम्हाला सकारात्मक होऊन जोखीम घ्यावी लागेल. आम्हाला दबावातून बाहेर येऊन आपली प्रक्रिया सुरू ठेवावी लागणार आहे. स्पर्धा अजूनही संपलेली नाही.”

या सामन्यानंतर भारतीय संघाचा उपांत्य फेरीत पोहचण्याचा मार्ग कठीण झाला आहे. तर न्यूझीलंड संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु येणाऱ्या सामन्यात जर न्यूझीलंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला तर, भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळू शकते. परंतु न्यूझीलंड संघाची कामगिरी पाहता असे होण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण न्यूझीलंड संघाचे पुढील सामने अफगानिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलॅंड संघाविरुद्ध असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जखमेवर मीठ! मोठ्या फटक्याच्या नादात कोहली झेलबाद, कॅच टिपल्यानंतर बोल्टने ‘अशी’ उडवली खिल्ली

दैदिप्यमान कारकिर्दीची अखेर! असगर अफगाणला मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’; पाहा भावनिक व्हिडिओ

हार्दिकच्या नावावर ‘मोठा’ विक्रम, यापूर्वी केवळ युवराज सिंगला जमलाय ‘असा’ पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---