सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना बेंगळुरूच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने शानदार विजय मिळवला. आता दुसरा कसोटी सामना पुणे येथे खेळला जाणार आहे. तत्पूर्वी या बातमीद्व्रारे आपण पुण्याच्या मैदानावरील 3 भारतीय खेळाडूंच्या शानदार रेकाॅर्डबद्दल जाणून घेऊया.
विराट कोहली- भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही काळापासून कसोटीत चांगली कामगिरी करत नसला तरी पुण्यात त्याची आकडेवारी चमकदार आहे. पुण्याच्या या मैदानावर कोहलीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्याने या मैदानावर 2 सामन्यांच्या 3 डावात 133.50च्या सरासरीने 267 धावा केल्या आहेत. कोहलीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी देखील याच मैदानावर आली, जेव्हा त्याने नाबाद 254 धावा केल्या होत्या.
मयंक अग्रवाल- गेल्या 2 वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) पुण्यात चांगली कामगिरी केली आहे. त्याने पुण्यात 1 सामना खेळला आहे आणि 1 डावात त्याने 108 धावांची शानदार खेळी केली आहे. या मैदानावर सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्यांच्या यादीत मयंक हा भारताचा दुसरा फलंदाज आहे.
रवींद्र जडेजा- भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) बॉल आणि बॅट दोन्हीसह आपली ताकद दाखवतो. तसेच पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या कसोटीतही त्याने चांगली कामगिरी केली आहे. येथे त्याने 2 सामन्यांच्या 3 डावात 32च्या सरासरीने 96 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 91 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर गावसकर मालिका खेळणार वाॅर्नर? म्हणाला, “मी मागे हटणार…”
IND vs NZ; पुण्यातील खेळपट्टी कशी असणार? फिरकीपटूंना मिळणार मदत?
टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संधी न मिळण्याबाबत काय म्हणाला संजू सॅमसन?