येत्या काही दिवसात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढ्य संघ आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. २६ डिसेंबर पासून मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे. या मालिकेत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून तो साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. दरम्यान क्रिकेटच्या मैदानात तो विक्रम करण्यात अपयशी ठरत असला तरीदेखील मैदानाबाहेर त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असतो. त्याचे कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. तसेच ट्वीटरवर देखील त्याला लाखो लोक फॉलो करतात. त्याने यावर्षी (२०२१) एक ट्वीट केले होते. जे या वर्षातील सर्वात जास्त रिट्वीट आणि लाईक करण्यात आलेले ट्वीट ठरले आहे.
हे ट्विट विराट कोहलीने माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी याच्यासाठी केले होते. आयपीएल २०२१ स्पर्धेत एमएस धोनीने दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात, सामना जिंकून देणारी खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या खेळी नंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी एमएस धोनीचे कौतुक करणारे ट्वीट केले होते. त्यापैकी विराट कोहलीने केलेलं ट्वीट चाहत्यांच्या पसंतीचे ठरले होते.
विराट कोहलीने ट्वीट करत लिहिले होते की, “किंग परतला आहे, या खेळातील सर्वोत्कृष्ट फिनिशर पैकी एक. आज रात्री पुन्हा एकदा मला माझ्या जागेवरून उडी मारण्यास भाग पाडले”
Anddddd the king is back ❤️the greatest finisher ever in the game. Made me jump Outta my seat once again tonight.@msdhoni
— Virat Kohli (@imVkohli) October 10, 2021
ट्विटरचे हे सर्वेक्षण १ जानेवारी ते १५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान भारतातील ट्विटर अकाऊंटद्वारे केलेल्या एकूण रिट्विट्स आणि लाईक्सच्या संख्येवर आधारित आहे. तसेच क्रीडा स्पर्धेबद्दल बोलायचं झालं, तर सर्वाधिक ट्वीट टोकियो २०२० स्पर्धेबद्दल करण्यात आले होते. त्यानंतर आयपीएल २०२१ आणि टी२० विश्वचषक स्पर्धा यांचा समावेश होता. पॅरालिम्पिक आणि युरो २०२० ने ट्विटरवर सर्वाधिक चर्चेत असलेल्या इव्हेंटमध्ये टॉप-५ मध्ये स्थान मिळवले आहे.
महत्वाच्या बातम्या :
द. आफ्रिका दौरा: ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यर इन, तर १७ शतके झळकावणारा फलंदाज होऊ शकतो संघाबाहेर
शेन वॉर्नने निवडले सध्याचे कसोटीतील ५ उत्कृष्ट फलंदाज, ‘या’ भारतीयाला दिले स्थान
“लोकं काय बोलतात यावर माझं लक्ष नाही”, वनडे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रोहितची पहिली प्रतिक्रीया