---Advertisement---

फिटनेसमध्येही विराट कोहलीचा अनोखा रेकॉर्ड! ‘या’ 23 भारतीय खेळाडूंनी केलीये एनसीएची वारी

On: शनिवार, ऑक्टोबर 15, 2022 12:07 PM
Virat Kohli
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्या रिपोर्ट्सनुसार विराट कोहली सद्यस्थितीत भारताचा सर्वात फिट खेळाडू आहे. त्याचबरोबर 23 क्रिकेटपटूंनी 2021-22च्या सत्रात रिहॅबिलिटेशनसाठी बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी (एनसीए)मदत घेतली आहे. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन यांनी एनसीएच्या मागील सत्राचे रिपोर्ट्स सादर केले. त्यामध्ये त्यांनी कोणत्या भारतीय खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागला हे स्पष्ट केले आहे.

या रिपोर्ट्सनुसार, 2021-22च्या या सत्रात एनसीएमध्ये 70 खेळाडूंच्या एकूण 96 दुखापतींवर उपाय केला गेला. यातील 23 भारतीय पुरूष क्रिकेट संघ, 25 भारत ए किंवा युवा खेळाडू आणि एक 19-वर्षाखालील संघातील खेळाडू, 7 वरिष्ठ महिला संघाचे खेळाडू आणि 14 वेगवेगळ्या राज्यातील खेळाडू यांचा समावेश आहे.

बोर्डकडून केंद्रीय करारबद्ध असलेल्या या 23 खेळाडूंमध्ये कर्णधार रोहित शर्मा (मांसपेशियामध्ये ताण), केएल राहुल (हर्निया सर्जरीनंतर), चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, हार्दिक पंड्या, उमेश यादव, रिषभ पंत, इशांत शर्मा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, मंयक अग्रवाल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, अक्षर पटेल आणि रिद्धिमान साहा यांचा समावेश आहे.

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने क्रिकेटबरोबरच फिटनेसमध्येही विक्रम केला आहे. बोर्डच्या सुत्रानुसार, विराटने मागील एका वर्षात कोणत्याही दुखापतीबाबत एनसीएमध्ये येण्याची आवश्यकता पडली नाही. त्याच्या फिटनेसचे श्रेय त्यालाच जाते कारण त्याने स्वत:च्या फिटनेसची काळजी घेतली. त्याच्यापेक्षा वयाने 10 वर्ष लहान असलेल्या खेळाडूंनीही हॅमस्ट्रिंगची (मांसपेशीमध्ये ताण) तक्रार केली आहे.

यामध्ये शुभमन गिल, पृथ्वी साव, रुतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यर, केएस भरत, कमलेश नागरकोटी, संजू सॅमसन, इशान किशन, कार्तिक त्यागी, नवदीप सैनी आणि राहुल चाहर या युवा खेळाडूंचा समावेश आहे.

https://www.instagram.com/reel/CjnAGYkACCy/?utm_source=ig_web_copy_link

भारतीय संघ सध्या टी20 विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहे. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार असून भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध मेलबर्न येथे होणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे हे काय, कॅप्टन रोहितने तर पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग इलेवनच सांगून टाकली!
Asia Cup 2022: अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाच फेव्हरेट! आकडेवारीच आहे भन्नाट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---