---Advertisement---

अखेर तो दिवस आलाच ज्याची भारतीय क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पहात होते

On: रविवार, जानेवारी 19, 2020 1:55 PM
---Advertisement---

आज (19 जानेवारी) चिन्नास्वामी स्टेडियम (Chinnaswamy Stadium), बेंगळुरु (Bangalore) येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात वनडे मालिकेतील तिसरा (Last Match In the Series) आणि निर्णायक सामना पार पडणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) एक खास विक्रम करण्याची संधी आहे.

या सामन्यात विराटने जर 4 किंवा त्यापेक्षा अधिक चौकार मारले तर तो वनडेत सर्वाधिक चौकार मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) 1104 चौकारांचा विक्रम मोडेल. त्याचबरोबर विराट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येईल.

सध्या वनडेमध्ये सर्वाधिक चौकार ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) विराजमान आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सौरव गांगुली आहे. सचिनने 463 सामन्यांमध्ये 2016 चौकार मारले आहेत. तर गांगुलीने 308 सामन्यांमध्ये 1104 चौकार ठोकले आहेत.

विराटने आतापर्यंत 244 वनडे सामन्यांमध्ये 1101 चौकार मारले आहेत. त्यामुळे विराटला गांगुलीला मागे टाकण्याची संधी आहे.

वनडेमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे भारतीय फलंदाज –

2016 चौकार – सचिन तेंडूलकर – 463 सामने

1104 चौकार – सौरव गांगुली –  308 सामने

1101 चौकार – विराट कोहली – 244 सामने

1092 चौकार – विरेंद्र सेहवाग – 241 सामने

942 चौकार – राहुल द्रविड – 340 सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---