विराट की धोनी? भारी कोण? शाहिद कपूरने घेतले हे नाव

खेळाडूंमध्ये एकमेकांची तुलना होणे ही सामान्य गोष्ट आहे. जेव्हापासून खेळ सुरु झाला आहे तेव्हापासून हे होत आहे. अशाच प्रकारची तुलना भारताच्या दोन स्टार क्रिकेटपटूंची करण्यात आली.

भारतीय संघाचे स्टार क्रिकेटपटू एमएस धोनी आणि विराट कोहलीबद्दल (Virat Kohli) बॉलिवूड स्टार शाहिद कपूरला (Shahid Kapoor) प्रश्न विचारला होता. त्यावेळी शाहिदच्या उत्तराने चाहत्यांची मने जिंकली.

बॉलिवूड स्टार शाहिद ट्विटरवर लाईव्ह चॅट करत होता. या दरम्यान त्याला धोनी आणि कोहली यांच्यात सर्वात चांगला क्रिकेटपटू कोण आहे? असा प्रश्न विचारला होता. त्यावर शाहिदने उत्तर दिले की, “आई किंवा बाबा?”

याव्यतिरिक्त शाहिदने लाईव्ह चॅटदरम्यान अनेक मजेशीर उत्तरे दिली. जसे की, त्याला विचारण्यात आले की, लॉकडाऊन दरम्यान तो आपल्या पत्नीला कशाप्रकारे आनंदी ठेवेल? यावर शाहिद म्हणाला की, यावेळी पत्नीची सन्मानपूर्वक सेवा करा. मालक हा मालक असतो.

क्रिकेटप्रेमींना माहिती आहे की, कॅप्टन कूल धोनीने (MS Dhoni) भारतीय संघाला २ विश्वचषक जिंकून दिले आहेत. तो जगातील एकमेव कर्णधार आहे. ज्याच्या नेतृत्वात संघाने तीनही आयसीसीच्या स्पर्धा अर्थात ट्रॉफी वनडे विश्वचषक, टी२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

तर विराटबद्दल बोलायचं झालं तर तो सध्याचा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. तो भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार आहे. त्याने ७० आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. विराटचे चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, विराट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांचा विक्रम मोडेल.

ट्रेंडिंग घडामोडी-

-कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणारे ५ गोलंदाज, पहिल्या स्थानावर आहे एक भारतीय

-कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळताना टिच्चून फलंदाजी करणारे ५ फलंदाज

-टीम इंडिया जिथं १२ सामने खेळली ते मैदान आता होणार कोरोना बाधितांसाठी आयसोलशन सेंटर

You might also like