---Advertisement---

दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकल्यावर विराटने दिली प्रतिक्रिया! पाहा व्हिडिओ

On: सोमवार, डिसेंबर 28, 2020 4:18 PM
---Advertisement---

आयसीसीने नुकतीच दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या पुरस्कारांची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले. सर गारफिल्ड सोबर्स यांच्या नावे देण्यात येणार्‍या या पुरस्कारावर विराटने आपले नाव कोरले. त्याच प्रमाणे विराट दशकातील सर्वोत्तम पुरुष वनडे खेळाडूही ठरला.

पुरस्कार मिळाल्यानंतर विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या दशकातील महत्त्वाच्या घटनांबाबत बोलताना त्याने २०११ मधील वनडे विश्वचषक, २०१३ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१८ साली ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका विजय यांचा उल्लेख केला. या दशकातील आपल्या कामगिरीबद्दल बोलताना म्हणाला, “भारतासाठी खेळणे ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी मिळालेला हा पुरस्कार असल्याने मी ते भाग्य समजतो. सातत्याबाबत बोलायचे झाल्यास तुम्ही एकट्याने काहीही साध्य करू शकत नाही. तुम्हाला संघ म्हणून एकजुट असणे गरजेचे असते. आम्ही मागील दशकात तेच करायचा प्रयत्न केला. विजय असो किंवा पराभव, संघ म्हणून एकत्र राहण्यावर आम्ही भर दिला. माझ्या फलंदाजीतील सातत्य मला नक्कीच इथून पुढे कायम ठेवायला आवडेल आणि भारताला अधिकाधिक सामने जिंकवून देण्याची माझे लक्ष्य असेल. कारण माझ्यासाठी संघाचा विजय, हेच प्रमुख ध्येय आहे.”

विराटची विस्तृत प्रतिक्रिया-

विराटने दशकातील सर्वोत्तम पुरुष वनडे क्रिकेटपटूची पुरस्कारही पटकावला. त्यावर प्रतिक्रिया देताना विराट म्हणाला, “वनडे सामन्यात मी माझे पदार्पण कसोटीआधी झाले होते. त्यामुळे मला या फॉरमॅटला समजून घ्यायला मदत झाली. वनडे सामन्यांतील माझे आकडे नक्कीच सुखावह आहेत, पण संघाला विजय मिळवून देणे हेच माझे मुख्य लक्ष्य असते. तुम्ही चांगला खेळ करून संघाला विजय मिळवून दिला, तर आकडे आणि विक्रम आपोआप तुमच्या खात्यावर जमा होतात. त्यामुळे मी त्याकडे फार लक्ष देत नाही. माझ्यासाठी या दशकातील खास असलेल्या खेळींचा उल्लेख करायचा झाला तर पाकिस्तानविरुद्ध आशिया कप स्पर्धेतील १८३ धावांची खेळी, तसेच २०११च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यातील ३५ धावांची खेळी, यांची नाव मी घेईल. शिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २०१३ सालच्या भारतातील मालिकेतील दोन शतके सुद्धा माझ्या हृदयाच्या जवळ आहेत.”

पूर्ण व्हिडिओ:

आयसीसीच्या या दशकातील पुरस्कारांवर भारत-ऑस्ट्रलियन क्रिकेटपटूंचे वर्चस्व राहिले आहे. आयसीसीच्या एकूण १० पुरस्कारांपैकी ७ पुरस्कार भारत आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी पटकावले आहेत. या पुरस्कारांसाठी खेळाडूंची १ जानेवारी २०११ ते ७ ऑक्टोबर २०२० या कालावधीतील कामगिरी लक्षात घेण्यात आली असून यासाठी चाहत्यांनी मते देखील लक्षात घेण्यात आली आहेत.

महत्वाच्या बातम्या:
– संपूर्ण यादी : हे खेळाडू आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम पुरस्कारांचे मानकरी; भारत-ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सचे वर्चस्व
– व्हिडिओ: हेल्मेटमुळे वाचलं ऑस्ट्रेलियन फलंदाज डोकं; नाहीतर बुमराहच्या जोरदार चेंडूमुळे घडली असती दुर्घटना
– रहाणेला बाद का दिलं? पाहा काय होतं नक्की तांत्रिक कारण?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---