---Advertisement---

विराट कोहली पत्नी अनुष्काला म्हणाला, ‘बेंगलोर गर्ल’; सांगितले आरसीबीशी खास कनेक्शन

On: गुरूवार, फेब्रुवारी 3, 2022 8:35 PM
Virat Kohli And Anushka Sharma
---Advertisement---

राॅयल चॅलेंजर्स बॅंगलोरचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) यावर्षीच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार तर आहे, पण तो संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाहिये. कारण मागील वर्षीच्या आयपीएलनंतर तो कर्णधारपद सांभाळणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला पार पडणार असून तत्पुर्वी संघाने विराट कोहलीला १५ कोटी रुपयांना तर ग्लेन मॅक्सवेलला ११ कोटी आणि मोहम्मद सिराजला ७ कोटी रुपयांना रिटेन केले आहे. लिलावापुर्वी आरसीबीच्या पाॅडकास्टमध्ये कोहलीने पत्नी अनुष्का शर्माबाबतच्या काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

विराट कोहली आरसीबीचा माजी कर्णधार असुन २००८ पासुन तो आरसीबी संघासोबत आहे. आयपीएल २०२१ च्या शेवटी त्याने कर्णधारपदाचा राजिनामा दिला. आता त्याला फक्त खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे. बेंगलोर शहराशी अतुट नाते असलेला कोहली नेहमीच आरसीबी संघाकडून खेळणे पसंत करतो. त्याची पत्नी म्हणजेच बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हीचा सुद्धा बेंगलोर संघाशी खास संबंध असल्याचा खुलासा विराट कोहलीने पाॅडकास्ट दरम्यान केला आहे.

हेही वाचा- आरसीबीच्या ‘या’ खेळाडूने कोट्यवधी सोडून करियरला दिले प्राधान्य, मेगा ऑक्शनमध्ये नाही नोंदवले नाव

कोहली आरसीबी पाॅडकास्टमध्ये म्हणाला, “ती बेंगलोरची मुलगी आहे. ती तेथे मोठी झाली आहे. तिने बेंगलोरमध्ये खुप कालावधी घालवला आहे. ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. तीचं पहिल्यापासुन त्या शहराशी खास कनेक्शन आहे. त्यामुळे ती खुप खुश आहे की मी आरसीबीसाठी खेळतो आणि माझी प्रतिबद्धता नेहमी या फ्रॅंचायझी आणि या शहरासाठी राहणार आहे. जेव्हा आम्ही चांगली कामगीरी करत नाही तेव्हा ती सुद्धा नाराज होते.”

पुढे तो म्हणाला, “जसे मी म्हणालो तीचे बेंगलोरशी खास संबंध आहेत. त्यामुळे जेव्हा आम्ही चांगले खेळतो आणि सामना जिंकतो तेव्हा ती खुप आनंदी होते. सुदैवाने सर्वगोष्टी योग्य मार्गाने एकत्र आले, मी आरसीबीसाठी खेळतो, तर ती या शहराशी विशेष आत्मियता ठेवते. आता जेव्हा आम्ही बेंगलोरला खेळण्यासाठी जातो, तेव्हा ती तेथे तीच बालपण पुन्हा आनंदाने जगते.”

पुढे कोहली म्हणाला, “१४ वर्षाखालील, १५ वर्षाखालील एनसीए शिबीरांसाठी बेंगलोरला यायचो. तेव्हापासुन माझ्या जीवनावर त्याचा कायम मजबुत प्रभाव पडला आहे आणि आम्ही तेथे २ ते अडीच महिने राहायचो. ज्या शहरात तुमचा जन्म झाला नाही आणि तुम्ही तेथे मोठेही झाला नाही अशा शहरात राहण्याचा अनुभव वेगळाच असतो.”

अभिनेत्री अनुष्का शर्माने बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्यापुर्वी तीचे लहानपण बेंगलोरमध्ये घालवले आहे. विराट कोहली दिल्लीचा आहे तर अनुष्का उत्तरप्रदेशची असुनही तीचे वडील आसामला सैन्यात असल्यामुळे तिला आसामला जावे. आसाममध्ये प्राथमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर तीने माध्यमिक शिक्षण बेंगलोर येथे आर्मीच्या शाळेत पुर्ण केले. त्यानंतर तिने बेंगलोरच्याच माउंट कार्मेल काॅलेजमध्ये ग्रॅज्युएशन पुर्ण केले. त्यामुळे कोहली तिला बेंगलोर गर्ल म्हणतो.

महत्त्वाच्या बातम्या-

आरसीबीच्या ‘या’ खेळाडूने कोट्यवधी सोडून करियरला दिले प्राधान्य, मेगा ऑक्शनमध्ये नाही नोंदवले नाव

कामाच्या तानामुळे नाही, तर ‘या’ कारणामुळे उपकर्णधार केएल राहुल पहिल्या वनडेत असेल अनुपस्थित

भारतीय यष्टीरक्षकाने ५००च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा, फक्त बाउंड्रींनी धावा करणारा पहिलाच क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---