विराटचे पहिले प्रेम अनुष्का नाही तर दुसरेच कोणी तरी आहे, विराटने स्वत:हा सांगितले त्याच्या पहिल्या प्रेमची कथा
विराट कोहली आणि अनुष्का शर्माची प्रेमकथा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कसे ते दोघे जाहिराती दरम्यान एकत्र आहेत, तेथून त्यांची ओळख वाढली आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर २०१७ साली त्यानी लग्न केले. हे आपल्या सर्वांचा माहिती आहे. परंतु, आता अशा एका गोष्टीचा विराटने खुलासा केला आहे जे ऐकुन तुम्हाला सर्वांना ऐकुन आश्चर्य वाटेल. विराटचे पहिले प्रेम अनुष्का नाही. त्याच्या बालपणीचे प्रेम कोणीतरी वेगळेच होते. याचा खुलासा स्वतः हा विराटने केलेला आहे.
विराटने चक्क त्याच्या पहिल्या प्रेमासाठी पत्रही लिहिले आणि ते इंस्टाग्रामवर पोस्टही केले आहे. विराटने या प्रेमपत्रामध्ये लिहिलेले आपले प्रेम खरे आहे, असे सांगितले.
विराटने क्रिकेटसाठी या प्रेमाला सोडले होते. क्रिकेट करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी या प्रेमाला विराटने बाजूला ठेवले होते. परंतु आता तो आपल्या प्रेमाला भेटण्यासाठी खूप आतुरला आहे. विराटला कोणाची आठवण येत आहे, हे जर तुम्हाला समजले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. विराटला ‘बटाटा’ ची आठवण येत आहे.
विराटचे पहिले प्रेम म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ‘बटाटा’ हे आहे. त्याने बटाटासाठी इंस्टाग्रामवर प्रेमपत्र लिहिले. हे पत्र वाचणाऱ्याला एकदातरी हसू येईल, असे हे पत्र आहे. विराट आपल्या तंदुरुस्तीबाबत किती जागरूक आहे हे कोणालाही सांगायची गरज नाही. विराट तंदुरुस्तीच्या बाबत अनेकांचा आदर्श आहेत. त्यांनी आपल्या तंदुरुस्तीसाठी अनेक पदार्थांची आहुती दिलेली आहे.
पहिली भेट आलू पराठा
विराटने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला होता, त्यामध्ये त्याने बटाट्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे त्याने लिहिले की, “माझ्या प्रिय बटाट्या, मी हे पत्र तुझ्यासाठी लिहितोय कारण मला माहित आहे की तूच माझे खरे प्रेम आहे. मला आपली पहिली भेट लक्षात आहे. तेव्हा मी तुला आलू पराठ्यामध्ये पाहिलं होतं. मला आठवतं की. मी तुला किराणा दुकानांमधून एका खऱ्या चाहत्यासारखे घेऊन आलो होतो. मला अजूनही तो दिवस आठवत आहे, जेव्हा मी तुला थिएटरमध्ये भेटलो होतो. मी तुला माझ्या हातामध्ये घेऊन बसलो होतो आणि तू लाल केचअप घालून असायचा.”
तुझ्याविना माझे आयुष्य अपूर्ण आहे
विराटने पुढे लिहिले की, “आता मला जाणीव झाली आहे की तुझ्या विना माझं जीवन अपूर्ण आहे जसे ‘आलू के बिना आलू गोभी’. तुझ्यासोबत मटार असायची. जेव्हापासून तू माझ्या आयुष्यातून गेलास, तेव्हापासून जिरेपण अपूर्ण आहे आणि माझे जीवन ही अपूर्ण आहे. मला आपल्या मसालेदार वेळेची आठवण होत आहे, बटाटा.”

या पत्राच्या शेवटी विराटने लिहिले होते की,”आपल्या प्रेमाचा प्रवास आणखी राहिला आहे. कारण प्रेमाचा कधीच शेवट होत नाही.” याचाच अर्थ असा आहे की विराटच्या या प्रेमपत्राचा दुसरा भागही आपल्या सर्वांसमोर येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीयांपेक्षा मागे, पण का? इमाम-उल-हक यांनी सांगितले कारण
जबरदस्त हिम्मत! ज्या कारणामुळे संघाबाहेर झाला, चुरशीच्या टी२० विश्वचषकात त्यातच आजमावणार हात
जर जोकोविच फ्रेंच ओपन जिंकला तर कोण-कोणते विक्रम करु शकतो आपल्या नावावर?