---Advertisement---

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं हे भाग्य! – विराट कोहलीची भावनिक प्रतिक्रिया

On: सोमवार, मार्च 10, 2025 2:38 PM
---Advertisement---

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा किताब जिंकलेला आहे. टीम इंडियाने रविवारी न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात पराभव केला. भारतीय संघाचा हा विजय रोहित आणि विराटसाठी खूप महत्त्वाचा आहे. विराटने सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो. तसेच मी पराभवातून कायम खूप काही शिकत आलो आहे. याचबरोबर त्याने भारतीय संघाच्या विजयाचं श्रेय संपूर्ण संघाला दिले आहे.

विराटनेही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खूप महत्वाची आणि शानदार कामगिरी केली. त्याने उपांत्यफेरी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 84 धावा केल्या. तसेच त्यामध्ये 5 चौकार ठोकले. पण दुर्दैवाने अंतिम सामन्यात त्याला काही करता आले नाही. त्याला फक्त एका धावेवर परत जावे लागले. संपूर्ण स्पर्धेतील त्याची कामगिरी बघता त्याने खूप प्रभावी फलंदाजी केली आहे. कोहलीने स्पर्धेच्या 5 सामन्यात 218 धावा केल्या. या दरम्यान त्याने एक शतक आणि एक अर्धशतक सुद्धा केले आहे.

भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत खूप खराब पद्धतीने पराभव पत्करावा लागला होता. विराटने या पराभवावर देखील भाष्य केले. टेलिग्राफ माहितीनुसार विराट सामना जिंकल्यानंतर म्हणाला की, आम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून बरीच वर्ष झाली आहेत. आता या फॉरमॅटमध्ये जिंकण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आमच हेच ध्येय होतं. ऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी खूप कठीण गेला. त्यामुळे आताच्या विजयामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला आहे.

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील एकाही सामन्यात पराभूत झाला नाही. भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध सामना जिंकून स्पर्धेला सुरुवात केली होती. त्यांनी हा सामना 6 विकेट्सनी जिंकला होता. यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून 6 विकेट्सनी विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला 44 धावांनी पराभूत केले. तसेच उपांत्यफेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 4 विकेट्सने हरवले. शेवटच्या अंतिम सामन्यातही न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभूत केला.

हेही वाचा 

आयपीएलमध्ये दारू आणि तंबाखूच्या जाहिरातीवर बंदी घाला! आरोग्य विभागाची याचिका

क्रिकेटचा सोनेरी क्षण! या 7 भारतीय खेळाडूंनी पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफी जिंकून इतिहास रचला!

भारताच्या ऐतिहासिक विजयावर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया, पहिल्यांदा यांचे मानले आभार!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---