---Advertisement---

विंडीज विरुद्धच्या विजयानंतरही सेहवागने केली भारतीय फलंदाजांवर टीका, जाणून घ्या कारण

On: शुक्रवार, जून 28, 2019 4:02 PM
---Advertisement---

मँचेस्टर। 2019 विश्वचषकात गुरुवारी(27 जून) ओल्ड ट्रॅफर्ड मैदानानवर भारत विरुद्ध विंडीज संघात पार पडलेल्या 34 व्या सामन्यात भारताने 125 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी भारतीय संघ आता केवळ एक पाऊल दूर आहे.

मात्र अफगाणिस्तान आणि विंडीज विरुद्ध भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी ज्याप्रकारे खेळले त्याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने ट्विट करत टीका केली आहे.

सेहवागने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘राशिद खानने पहिल्या 4 षटकात 25 धावा दिल्या. तर नंतरच्या 6 षटकात केवळ 13 धावा दिल्या आणि आज फॅबियन ऍलेनने पहिल्या 5 षटकात 34 धावा दिल्या. त्यानंतरच्या 5 षटकात फक्त 18 धावा दिल्या. फिरकीपटूंविरुद्ध एवढे बचावात्मक खेळू शकत नाही.’

भारतीय फलंदाज हे नेहमी फिरकी गोलंदाजीविरुद्ध चांगल्या खेळासाठी ओळखले जातात. पण मागील दोन सामन्यात त्यांना फिरकी गोलंदाजी खेळताना संघर्ष करावा लागत असल्याचे दिसून आले आहे.

तसेच गुरुवारी विंडीजचा फिरकीपटू ऍलेनने टाकेलल्या नंतरच्या त्याच्या पाच षटकांचा सामना सर्वाधिक एमएस धोनी आणि विराट कोहलीने जास्त केला होता. यामध्ये धोनीने 19 चेंडूत 9 धावा केल्या. तर विराटने 9 चेंडूत 8 धावा केल्या. तसेच हार्दिक पंड्याने ऍलेनच्या 2 चेंडूंचा सामना करताना 1 धाव घेतली.

त्याचबरोबर अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यातही धोनीने 52 चेंडूत फक्त 28 धावांची खेळी केली होती. तसेच त्याने केदार जाधव बरोबर 14 षटके फलंदाजी करताना केवळ 57 धावांची भागीदारी केली होती.

त्यामुळे त्यांच्या संथ फलंदाजीवर मोठ्याप्रमाणात टीका झाली होती. त्यांच्यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही टीका केली होती. तसेच या सामन्यातही भारतीय फलंदाज ज्याप्रकारे फिरकी गोलंदाजी खेळले त्यावरही सचिनने नाराजी व्यक्त केली होती.

गुरुवारी भारत विरुद्ध विंडीज सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 268 धावा केल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने 72 धावांची तर एमएस धोनीने नाबाद 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच विंडीजकडून गोलंदाजीत केमार रोचने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

त्यानंतर भारताने दिलेल्या 269 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला 34.2 षटकात सर्वबाद 143 धावाच करता आल्या. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विजयाच्या आनंदात कर्णधार कोहलीने घेतली चाहत्यांबरोबर सेल्फी, पहा व्हिडिओ

कॉट्रेल बाद होताच शमी-विराटने केले त्याच्याच सॅल्यूट स्टाईलने सेलिब्रेशन,पहा व्हिडिओ

एमएस धोनीला पाठिंबा देत कर्णधार कोहलीने असे केले कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment