इंग्लंडची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असते. वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीचा स्विंग आणि बाऊंसर चेंडू टाकण्याचा पुरेपूर फायदा होतो. अशातच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनाही इंग्लंडमध्ये खेळला जात आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी (२० जून) न्यूझीलंड संघातील खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला. सुरुवातीला गोलंदाजांनी आपल्या वेगवान आणि स्विंग चेंडूंनी भारतीय संघाचा डाव २१७ धावांवर संपुष्टात आणला.
त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी देखील टिच्चून फलंदाजी केली. यावेळी भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. परंतु त्यांना साजेशी कामगिरी करण्यात यश आले नाही. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने ट्विट करत भारतीय गोलंदाजांबद्दल निराशा व्यक्त केली आहे. (Virender Sehwag disappointed on Indian bowlers as they falied to swing the ball)
न्यूझीलंड संघातील वेगवान गोलंदाजांनी भारतीय संघातील फलंदाजांना आपल्या स्विंग गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवले. तसेच भारतीय संघात देखील जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी ही जगप्रसिद्ध वेगवान गोलंदाजांची तिकडी आहे, जी कुठल्याही फलंदाजी क्रमाला उध्वस्त करू शकते. परंतु तिसऱ्या दिवशी या गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्यात यश आले नाही. परिणामी न्यूझीलंड संघातील फलंदाजांना धावा करणे सोपे जात होते.
त्यामुळे संताप करत माजी भारतीय क्रिकेटपटू सेहवागने ट्विटमध्ये लिहिले की, “मूड स्विंग झाला पण चेंडू स्विंग झाला नाही.”
Mood swing ho gaya, ball nahi huyi.#WTCFinal21
— Virender Sehwag (@virendersehwag) June 20, 2021
चेंडू स्विंग करण्यात भारतीय गोलंदाज का ठरले अपयशी?
भारतीय संघातील गोलंदाजांना हवा तितका चेंडू स्विंग करता येत नव्हता. फक्त ईशांत शर्माला चेंडू स्विंग करण्यात यश मिळत होते. याचे कारण असे की, जेव्हा न्यूझीलंड संघातील गोलंदाज गोलंदाजी करत होते. तेव्हा वातावरण ढगाळ आणि थंड होते. तसेच भारतीय गोलंदाज गोलंदाजी करत असताना ऊन आले होते. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना हवी तितकी मदत मिळत नव्हती. परंतु वातावरणात बदल झाल्यानंतर ईशांत शर्माने डेवोन कॉनवेला माघारी धाडले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याच्या खराब शॉटची चर्चा करणे अयोग्य,’ इंग्लंडच्या माजी खेळाडूने घेतली पंतची बाजू
वॉर्नरच्या सुपरमॅन क्षेत्ररक्षणाची विलियम्सनने केली नक्कल; स्वत: ऑसी फलंदाजाने फोटो केला शेअर
विकेट मिळेना म्हणून विराट-शुबमनने अवलंबला स्लेजिंगचा मार्ग, किंवी फलंदाजांना ‘असं’ उकसावलं