Own Chef to Bring England on India Tour: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने अप्रतिम कामगिरी करत केपटाऊनमध्ये पहिला कसोटी विजय नोंदवला. आता दक्षिण आफ्रिका दौरा पूर्ण झाल्यानंतर भारतीय संघाला पुढील कसोटी मालिकेत इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे. उभय संघांमधील पाच सामन्यांची कसोटी मालिका 25 जानेवारीपासून भारतात होणार आहे. या मालिकेपूर्वी, इंग्लंड संघाबद्दल एक बातमी आली होती की, या दौऱ्यावर खेळाडूंच्या जेवनासाठी ते आपल्या शेफलाही सोबत घेऊन येणार आहेत. भारताचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने यावर बोलताना इंग्लंड संघाची खिल्ली उडवली आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाच्या सोशल मीडिया फॅन्स क्लब, इंग्लंड बार्मी आर्मीने शुक्रवारी, (5 जानेवारी) रोजी ट्विट केले की इंग्लंड आपल्या एका शेफला भारत दौऱ्यावर घेऊन जाईल. या दौऱ्यात कोणताही खेळाडू आजारी पडू नये असे इंग्लंड संघाला वाटत आहे. इंग्लंड बार्मी आर्मीचे हेच ट्विट शेअर करत वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “कुकच्या जाण्यानंतर ही गरज निर्माण झाली. आयपीएलमध्ये ही गरज पडणार नाही.” या मजेशीर ट्विटसोबत सेहवागने हसणारा इमोजीही टाकला आहे. (virender sehwag hilarious dig at england after reports emerge they will travel with personal chef for india tour)
Yeh zaroorat Cook ke jaane ke baad padhi 😂
IPL mein nahi padegi. https://t.co/6DMWrN2not
— Virender Sehwag (@virendersehwag) January 6, 2024
वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज ऍलिस्टर कुक (Alastair Cook) याचा उल्लेख केला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत इंग्लंडकडून 161 कसोटी सामने खेळले. या कालावधीत कुकने 33 शतके आणि 57 अर्धशतकांच्या मदतीने 12472 धावा केल्या. कूकने 2018 मध्ये ओव्हलवर भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला आणि त्याच्या शेवटच्या कसोटी डावात शतक झळकावले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. या मालिकेत कोणता संघ कोणावर वरचढ ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (Bringing own chef to India tour Sehwag mentions IPL troll, says After Cook’s departure this)
हेही वाचा
Afghanistan Squad: भारत दौऱ्यात प्रमुख अफगाणी खेळाडूंचे पुनरागम, टी-20 मालिकेसाठी ‘असा’ आहे संघ
WTC 2023-25 । पराभव पाकिस्तानचा, पण नुकसान भारताचे, ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वल स्थानी