नवी दिल्ली । तसं पाहिलं तर भारतीय संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागला क्रिकेट इतिहासातील विस्फोटक फलंदाजांपैकी एक समजले जाते. तसेच त्याच्या नावावर आतापर्यंत अनेक विक्रमदेखील आहेत. परंतु आज आपण अशा विक्रमाबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यावर आजपर्यंत कोणीही लक्ष दिलेले नाही.
आता सर्वांना हा प्रश्न पडला असेल की तो कोणता विक्रम आहे. या लेखात आपण त्याच विक्रमाबद्दल चर्चा करणार आहोत.
जेव्हा- जेव्हा सेहवागचे (Virender Sehwag) नाव घेतले जाते तेव्हा सर्व चाहत्यांना वादळ, विस्फोटक अशाप्रकारचे शब्द सुचतात. कारण सेहवाग जेव्हा गोलंदाजांची फटकेबाजी सुरु करत होता, तेव्हा तो आपल्या फलंदाजीमुळे गोलंदाजांना चिंतेत टाकत होता. गोलंदाजांमध्ये सेहवागची इतकी भीती होती की, गोलंदाजांची लाईन, लेंथ आणि वेग सर्वांमध्ये चूका होत होत्या. त्यामुळेच सेहवागने क्रिकेटमध्ये असे स्थान मिळवले जे क्वचितच शक्य आहे.
आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक केले. तसेच त्याने सचिन तेंडुलकरनंतर (Sachin Tendulkar) वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा दुसरा फलंदाजदेखील बनला. सेहवागचा हा विक्रम वेगळाच आहे कारण क्रिकेट इतिहासात कसोटीत त्रिशतक आणि वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा सेहवाग पहिला व एकमेव भारतीय फलंदाज आहे.
गेलने केला आहे असा पराक्रम-
सेहवाग सोडून केवळ ख्रिस गेलने हा पराक्रम केला आहे. ख्रिस गेलने कसोटीत ३३३ तर वनडेमध्ये २१५ धावांची खेळी केली आहे. वनडेत केवळ ६ पुरुष खेळाडूंनी द्विशतक केली आहेत. परंतु सेहवाग व गेललाच कसोटीत त्रिशतक करता आले आहे.
अन्य भारतीय फलंदाजांना नाही जमला हा कारनामा-
सेहवागनंतर असा पराक्रम कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आलेला नाही. मग तो खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) असो किंवा विराट कोहली (Virat Kohli) असो किंवा मग सचिन तेंडूलकर (sachin Tendulkar) असो. तसं पाहिलं तर रोहितने वनडेत ३ द्विशतक केलेले आहेत. परंतु कसोटीत त्याला आतापर्यंत एकदाही त्रिशतक करता आलेले नाही.
विराट आणि रोहितच्या उलट सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक आणि वनडेत द्विशतक करण्याचा विक्रम फार पूर्वी करून दाखविला होता. त्याने आपल्या कारकीर्दीतील पहिले त्रिशतक (Triple Century) २००४मध्ये मुल्तान येथे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात केले होते. तसेच २००८मध्ये त्याने पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्रिशतक पूर्ण केले होते.
चेन्नईमध्ये खेळण्यात आलेल्या या कसोटी सामन्यात सेहवागने ३०४ चेंडूत ३१९ धावांची विस्फोटक खेळी केली होती. तसेच तो २ त्रिशतक करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला होता. सेहवागने २०११ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध खेळताना वनडेत द्विशतक करण्याचा कारनामा केला होता. त्याने इंदोरमध्ये खेळताना १४९ चेंडूत २१९ धावा करत भारताला १५३ धावांनी विजय मिळवून दिला होता.
सेहवागचा कसोटीमध्ये त्रिशतक आणि वनडेत द्विशतक (Double Century) करण्याचा विक्रम आजदेखील भारतीय फलंदाजांना मोडता आलेला नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कर्णधार झाल्या झाल्या बाबर आझमची या खेळाडूने काढली अब्रू
-१० भारतीय दिग्गज क्रिकेटपटू व त्यांच्या एक्स गर्लफ्रेंड्स
-जगातील ‘हे’ ५ दिग्गज गोलंदाज वनडे सामन्यात ५ बळी मिळवण्यात ठरलेत अपयशी