---Advertisement---

रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार मिळणार की नाही? सेहवाग घेणार निर्णय

On: रविवार, ऑगस्ट 2, 2020 8:22 AM
---Advertisement---

क्रीडा मंत्रायलाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२० साठी काल (३१ जुलै) निवड समितीची घोषणा केली आहे. या निवड समितीत माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागची निवड करण्यात आली आहे. मंत्रालयाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश मुकुंदकम शर्मा हे समितीचे अध्यक्ष असतील.

या निवड समितीच्या सदस्यांमध्ये सेहवागव्यतिरिक्त, सरदार सिंग (हॉकी), मोनालिसा बरुआ मेहता (टेबल टेनिस), दीपा मलिक (पॅरा ऍथलेटिक्स) आणि वेंकटेशन देवराजन (बॉक्सिंग) यांचा समावेश आहे. तसेच, खेळ समालोचक मनीष बटाविया, क्रीडा पत्रकार आलोक सिन्हा आणि नीरु भाटिया हेदेखील समितीत असतील.

क्रीडा मंत्रालयातील भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान, क्रीडा विभागाचे संयुक्त सचिव एलएस सिंग आणि टारगेट ऑलिंपिंक पोडियम (टॉप्स) योजनेचे सीईओ राजेश राजागोपालन हे समितीत असतील. द्रोणाचार्य पुरस्काराठी अध्यक्ष २ अतिरिक्त सदस्यांना सामाविष्ट करु शकतात, ज्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला असावा.

या समितीला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार आणि मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफीच्या विजेत्यांची निवड करावी लागणार आहे. हे पुरस्कार २९ ऑगस्ट रोजी महानतम हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साजरा करण्यात येणाऱ्या क्रीडा दिनादिवशी देण्यात येतात.

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माचे नाव यावेळी बीसीसीआयने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी पाठवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-बकरी ईदच्या निमित्ताने पीसीबीने पाठवले पाकिस्तान संघाला ‘स्पेशल गिफ्ट’, पहा व्हिडिओ

-‘या’ ज्येष्ठ भाजप नेत्याच्या मुलाला सीके खन्ना ग्रुपचे समर्थन, बनणार दिल्ली क्रिकेटचा अध्यक्ष

-‘भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘या’ गोलंदाजाप्रमाणे गोलंदाजी करू शकणार नाहीत’

ट्रेंडिंग लेख –

-जिगरी दोस्त असलेले क्रिकेटर झाले एकमेकांचे वैरी, पुढे…

-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर

-क्रिकेटवर बनलेल्या या २ जबरदस्त बॉलिवूड चित्रपटांना दुर्लक्ष करुन चालणार नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---