भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे हा नेहमीच त्याच्या संघ सहकाऱ्यांना पाठिंबा देताना दिसला आहे. याचे एक उदाहरण नुकतेच माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग याने दिले आहे. वर्ष २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सेहवागला भारतीय संघात स्थान मिळण्याची कसल्याही शक्यता नव्हत्या. मात्र कर्णधार कुंबळेने निवडकर्त्यांना सेहवागला संघात घेण्याची मागणी केली होती. सेहवागने या संधीचा फायदा घेत कसोटी संघात दमदार पुनरागमन केले होते. आता हाच प्रसंग आठवत सेहवागने त्याची कारकिर्द वाचवण्याचे श्रेय कुंबळेला दिले आहे.
वर्ष २००७ मध्ये सेहवाग (Virender Sehwag) खराब फॉर्ममधून जात होता. त्याने ५०च्या सरासरीने धावा केल्या असतानाही त्याला भारताच्या कसोटी संघातून बाहेर केले गेले होते. जानेवारी २००७ मध्ये त्याने आपला ५२ वा कसोटी सामना खेळल्यानंतर त्याला पुढील ५३वा कसोटी सामना खेळण्यासाठी २००८ ची वाट पाहावी लागली होती.
स्पोर्ट्स १८वर ‘होम ऑफ हिरोज’ या सिरीजमधील एका एपिसोडमध्ये हा किस्सा सांगताना सेहवाग म्हणाला की, “अचानक मला जाणीव झाली की, मी कसोटी संघातून बाहेर होत आहे, यामुळे मला दु:ख झाले होते. जर त्यावेळी मला संघाबाहेर केले गेले नसते, तर मी कसोटी क्रिकेटमध्ये १० हजारपेक्षा जास्त धावा केल्या असत्या.”
२००७-०८ बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सेहवागला कसोटी संघात सामील केले जाईल, असे वचन कुंबळेने (Anil Kumble) सेहवागला दिले होते. कुंबळेच्या या निर्णयाने सर्वांना चकित केले होते.
सेहवागला दिलेल्या वचनानुसार कुंबळेने ऍडलेड कसोटीत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली होती. या सामन्यातील पहिल्या डावात सेहवागने ६३ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात १५१ धावांची शानदार खेळी केली होती. या सामन्याची आठवण काढत सेहवाग म्हणाला की, “त्या ६० धावा माझ्या आयुष्यातील सर्वात अवघड धावा होत्या. कारण मला अनिल भाईच्या विश्वासावर खरा उतरायचं होतं. मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आणल्याने त्याच्यावर कोणी प्रश्न उपस्थित करावे, अशी माझी अजिबात इच्छा नव्हती.”
सेहवागने या कसोटी सामन्यातील संघाच्या दुसऱ्या डावात आपला जोडीदार बाद झाल्यानंतरही विस्फोटक खेळी केली होती. या खेळीबद्दल सेहवाग म्हणाला की, “मी स्ट्राईकर बाजूला टिकून होतो. दुसऱ्या बाजूला मी माझे आवडते गाणे गुणगुणत पंचांशी बोलत होतो, ज्यामुळे माझा दबाव कमी झाला.”
या दौऱ्यानंतर कुंबळेने सेहवागला वचन दिले होते की, “जोपर्यंत तो कसोटी संघाचा कर्णधार राहिल, तोपर्यंत सेहवागला संघाबाहेर झाऊ देणार नाही. एक खेळाडू म्हणून कोणालाही सर्वात जास्त त्याच्या कर्णधारावर विश्वास असतो. माझ्यासाठी कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळात सौरव गांगुलीनंतर असा कर्णधार म्हणून कुंबळे मिळाला होता.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘देशातील ऑलिम्पिक चळवळ अधिक भक्कम होण्याबाबत मी आशादायी’, नीता अंबानीचे मोठे वक्तव्य
पहिल्याच सामन्यात विकेट्सचा ‘चौकार’ मारणाऱ्या पूजाच्या भेदक गोलंदाजीमागील कारण, वाचा काय म्हणाली?