---Advertisement---

इंग्लंड संघाबाबत वीरेंद्र सेहवागचं धक्कादायक विधान; म्हणाला, ‘इंग्लंडचा संघ अतिशय…’

England Cricket Team
---Advertisement---

इंग्लंडचा संघ विश्वचषक 2023 मध्ये गतविजेता म्हणून आला होता पण त्यांची कामगिरी अजिबात चांगली राहिली नाही. त्यांनी आतापर्यंत या विश्वचषकात 5 सामने खेळले आहेत. त्यातील 4 सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असून त्यामुळे त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने इंग्लंड संघाबाबत धक्कादायक विधान केले आहे. तो म्हणाला, इंग्लंड संघाने वनडेमध्ये कधीही चांगला खेळ केला नाही.

विश्वचषक 2023 मध्ये इंग्लंडची कामगिरी लाजिरवाणी राहिली आहे. गुरूवारी (26 ऑक्टोबर) श्रीलंकेविरुद्धही संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 33.2 षटकात केवळ 156 धावांवरच सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात श्रीलंकेने केवळ 25.4 षटकात 2 विकेट्स गमावून हे लक्ष्य सहज गाठले. इंग्लंडचा पाच सामन्यांमधला हा चौथा पराभव असून गुणतालिकेत ते 9व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्याचबरोबर या विजयानंतर श्रीलंकेचा संघ पाचव्या स्थानावर आला आहे.

वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने ट्विट करत लिहिले की, “एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडचा संघ अतिशय सामान्य संघ आहे. 2019 चा विश्वचषक सोडला तर गेल्या आठ विश्वचषकांपैकी ते सात वेळा उपांत्य फेरीतही पोहोचू शकले नाहीत. त्याचा संघ स्थिर राहिला नाही आणि त्यात अनेक बदल झाले. कसोटी संघाप्रमाणेच एकदिवसीय संघही अतिशय चांगला आहे, असा त्यांचा विचार आहे. त्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागले आहे.”

इंग्लंड संघाला विश्वचषकातील आपला पुढचा सामना या स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाशी 29 ऑक्टोबरला खेळायचा आहे. भाारताने या विश्वचषकात आतापर्यंत 5 सामने खेळले असून पाचही सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. गुणतालिकेत 10 गुणांसह भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. (Virender Sehwag shocking statement about England team Said England team is very)

म्हत्वाच्या बातम्या 

आता बाबरला रोखणं कठीण! विश्वचषकातील तिसरं अर्धशतक ठोकत दिले फॉर्मात परतल्याचे संकेत

‘मेरी वाली अलग है, असं कधीच…’, रिलेशनशिपविषयी धोनीचा तरुणांना मजेशीर सल्ला, Video Viral

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---