भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने ओडिशा रेल्वे दुर्घटनेमध्ये मृत्यु झालेल्या कुटुंबियांना मदतीचा हात पुढे केला आहे. सेहवागने आपल्या सेहवाग इंटरनॅशनल स्कूल मध्ये मृतांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची मोठी घोषणा केली. याबाबत सेहवागने ट्विट करून माहिती दिली.
ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोक मदतीचा हात पुढे करत आहेत. अशातचं, वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) मागे न राहता मृत कुटुंबियांना मदतीचा हात दिला. आपल्या पर्सनल अकाउंटवरून ओडिशा रेल्वे प्रकरणाचा फोटो शेअर करत सेहवागने लिहिले की, “हा फोटो आपल्याला दीर्घकाळ सतावत राहिल. या दुःखाच्या काळात, या वेदनादायक घटनांमध्ये ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. मी अशा मुलांना सेहवाग इंटरनॅशनल स्कूलच्या (Sehwag International School) बोर्डिंग सुविधेत मोफत शिक्षण देण्याची घोषणा करतो.”
त्याने पुढच्या ट्विटमध्ये लिहिले की, “बचाव कार्यात आघाडीवर राहिलेल्या सर्व शूर पुरुष आणि महिलांना तसेच स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या वैद्यकीय पथकांना आणि स्वयंसेवकांना माझा सलाम. या कठीण काळात आम्ही सर्वजण सोबत आहोत.”
रेल्वे प्रकरणावर सेहवागचे ट्विट
याआधी रेल्वे अपघाताचे वृत्त समोर आल्यानंतर सेहवागने ट्विट केले होते की, “ओडिशामधील कोरोमंडल एक्स्प्रेसला झालेल्या भीषण रेल्वे अपघाताबद्दल ऐकून अत्यंत दु:ख झाले. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या सर्व कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो. या अपघातामुळे जखमी झालेले सर्वजण लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.”
गौतम अदानींचा मदतीचा हात पुढे
सेहवाग व्यतिरिक्त अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Adani Group Chairman Gautam Adani) यांनीही रेल्वे अपघातात पालक गमावलेल्या मुलांच्या शालेय शिक्षणाची काळजी घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, गौतम अदानी यांनी ट्विट करत लिहीले की, “या दुर्घटनेत ज्या मुलांचे पालक गमावले आहेत त्या मुलांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह उचलेल, असे आम्ही ठरवले आहे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण म्हणतंय ‘सुपरस्टार’, तर कुणी विराटच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात! कांगारुंकडून ‘किंग’ कोहलीचं कौतुक
भारतासाठी 7 वर्षांपासून खेळतोय, 212 विकेट्सही नावावर, पण कधीच खेळला नाही कसोटी सामना; तो खेळाडू कोण?