इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत १५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी अखेरच्या दिवशी फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात महत्त्वाचे योगदान दिले.
पाचव्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीला उतरला. तेव्हा पहिल्या सत्रातच रिषभ पंत आणि इशांत शर्मा यांनी विकेट गमावल्या. त्यानंतर तळातल्या फळीतील जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. दोघांनीही ९ व्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. तसेच एक वेळ वरचढ असणाऱ्या इंग्लंडच्या संघाला अडचणीत टाकले. बुमराहने नाबाद ३४ आणि शमीने नाबाद ५६ धावा केल्या.
दोघांच्या या अर्धशतकी भागीदारीमुळे भारतीय संघ चांगल्या स्थितीत आला. त्यानंतर भारतीय संघाने २९८ धावांवर डाव घोषित केला. ज्यामुळे इंग्लंड संघाला २७२ धावांचे लक्ष्य मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघ १२० धावांत गारद झाला.
दरम्यान, बुमराह आणि शमी यांच्या फलंदाजीचे कौशल्य पाहून अनेक दिग्गज खेळाडूंनी या दोघांचे कौतुक केले. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेवागने तर या दोघांच्या खेळीची भारताचे माजी क्रिकेटर राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या भागीदारीसोबत तुलना केली. सेहवागने कोलकाता कसोटीतील द्रविड आणि लक्ष्मण यांच्या फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर बुमराह आणि शमीचे चेहरे लावलेला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
सेहवागने याबाबत ट्विट करत लिहिले, “कमाल केली, शमी-बुमराह तुम्हाला सलाम, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.” तसेच समालोचन करतेवेळी देखील सेहवागने शमी आणि बुमराह यांच्या शॉट सिलेक्शनचे कौतुक केले. त्यांनी मारलेल्या शॉट्सवर सेहवाग खूप प्रभावित झाला. त्यामुळे सेहवाग म्हणाला, “विराट कोहलीने देखील आज पर्यंत तसे शॉट मारले नसतील ज्या प्रकारे हे दोघे मारत आहेत.”
Mauj karadi.
Shami- Bumrah , take a bow.
Taaliyan bajti rehni chahiye. pic.twitter.com/ViiTrBHvvj— Virender Sehwag (@virendersehwag) August 16, 2021
दुसऱ्या सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंड आणि भारतीय खेळाडूंमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या बुमराहला मार्क वूडने काही टिप्पणी केली. ज्यामुळे बुमराह चांगलाच भडकला. यानंतर इंग्लंडच्या जोस बटलरने देखील या वादात उडी घेतली. त्यानंतर हा वाद आणखीनच पेटला. त्यामुळे सामन्याच्या पंचांना मध्यस्थी करावी लागली. इंग्लिश खेळाडूंच्या या वर्तनामुळे विराट कोहली देखील चांगलाच भडकला होता.
महत्वाच्या बातम्या –
–‘खासच!’ बेअरस्टो बाद होताच विराट-रोहितने घेतलेली गळाभेट पाहून चाहते झाले खुश, व्हिडिओ व्हायरल
–क्रिकेटच्या पंढरीत विजय मिळवताच ‘कर्णधार’ कोहलीच्या नावावर ‘मोठा’ विक्रम; क्लाईव्ह लॉईडला टाकलं मागे
–जल्लोष तर होणारच! स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी लॉर्ड्सवर इंग्लंडला धूळ चारताच टीम इंडियाचे खास सेलिब्रेशन