---Advertisement---

“हर्षल पटेलला बोनस द्या”; माजी क्रिकेटरची आरसीबी मॅनेजमेंटकडे‌ मागणी

On: गुरूवार, मे 26, 2022 8:41 PM
Harshal-Patel-And-Virat-Kohli-And-Glenn-Maxwell
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आयपीएल २०२२ च्या एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा १४ धावांनी पराभव करून अंतिम फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. प्रथम फलंदाजी करताना फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीने २० षटकांत ४ गडी गमावून २०७ धावा केल्या. आरसीबीकडून रजत पाटीदारने नाबाद शतक झळकावले. त्यानंतर, जोस हेझलवूड आणि हर्षल पटेल यांनी सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये आपल्या अनुभवाचा उत्तम वापर करून, लखनऊला लक्ष्याचा पाठलाग करू दिला नाही. या विजयासह आरसीबी राजस्थान रॉयल्सविरुद्ध क्वालिफायर २ खेळेल. 

सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात हर्षलने ४ षटकांत २५ धावा देऊन एक बळी घेतला. भारताचा माजी क्रिकेटपटू व समालोचक वीरेंद्र सेहवागने हर्षल पटेलच्या प्रभावी कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले. सेहवाग म्हणाला, हा गोलंदाज आयपीएलमध्ये १४-१५ कोटी रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये येण्यास पात्र आहे.

एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना सेहवाग म्हणाला, “आपण नेहमी राहुल तेवतिया त्याच्या १० कोटींच्या किमतीला कसा न्याय देतो याबद्दल बोलतो. कारण त्याने गुजरात टायटन्सला सामने जिंकून दिले आहेत. हर्षलची किंमत अजूनही खूपच कमी आहे. त्याने आरसीबीसाठी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. त्याने संघासाठी सामने वाचवले आहेत. त्यामुळे मला वाटते की त्याच्यासाठी १०.७५ रुपये किंमत देखील कमी आहे. तो १४-१५ कोटी रुपयांच्या श्रेणीत असावा.”

सेहवाग पुढे म्हणाला, “तो स्लॉग ओव्हर्समध्ये गोलंदाजी करत आहे. त्याला विकेट मिळतायेत. काहीवेळा तो सुरुवातीचे षटक टाकतो, कमी धावा देतो आणि विकेटही घेतो. तेव्हाच खेळाचा टोन सेट होतो. त्यामुळे तोही या श्रेणीत येण्यास पात्र आहे, असे मला वाटते. या कामगिरीसाठी खरंतर त्याला बोनस मिळायला हवा.”

हर्षल पटेलने मागील वर्षी पर्पल कॅप जिंकली होती.‌ यावर्षी देखील त्याने कामगिरीत सातत्य ठेवत १९ बळी आपल्या नावे केले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“राहुल जबाबदारी उचलण्यास पात्र नाही”; माजी भारतीय क्रिकेटरचे टीकास्त्र 

शतक एक विक्रम अनेक! रजत पाटीदारच्या जबराट सेंच्युरीने पाडला विक्रमांचा पाऊस, टाका एक नजर 

पोलिसवाला की जॉन सीना? एलिमिनेटरमधील हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---