भारतीय संघाचा क्षेत्ररक्षणाचा स्तर गेल्या काही वर्षांमध्ये उंचावला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खेळाडूंचा फिटनेस. विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून त्याने खेळाडूंच्या फिटनेसवर खूप जोर दिला आहे. खेळाडू कितीही कौशल्यवान असला तरीही त्याला यो-यो टेस्ट पूर्ण केल्याशिवाय संघात स्थान दिले जात नाही. अशातच माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने यो-यो टेस्टबद्दल भाष्य केले आहे.
आयपीएल २०२० मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची संधी देण्यात आली होती परंतु तो यो-यो टेस्ट पूर्ण करण्यास अपयशी ठरला होता. म्हणून त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. यो-यो टेस्टबद्दल सेहवागचे स्पष्ट आहे की, फिटनेस गरचेचाच आहे पण त्यासोबत खेळाडूचे कौशल्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे.तसेच तो म्हणाला, यो यो टेस्ट आधीपासून असती तर सचिन ,गांगुली आणि लक्ष्मण कधीच त्यात पास होऊ शकले नसते.
तसेच तो पुढे म्हणाला,” अश्विन आणि चक्रवर्ती यामुळे खेळत नाहीये कारण ते यो-यो टेस्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. मी या सर्व गोष्टींना नाही मानत, कारण निवड याच गोष्टींच्या आधारे निवड करत असती तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण कधीच पास झाले नसते. मी बीप टेस्टमध्ये या खेळाडूंना पास होताना कधीच पाहिलं नाही. बीप टेस्टमध्ये १२ स्कोअर करावा लागायचा परंतु, सचिन ,गांगुली आणि लक्ष्मण १० किंवा ११ करू शकत होते. परंतु या खेळाडूंकडे कौशल्य होते.”
पुढे तो म्हणाला,”मला वाटते की कौशल्य ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपला संघ फिट असेल आणि आपण सामने गमावत असाल आणि खेळाडूंमध्ये कौशल्यांचा अभाव असेल तर ते चुकीचे आहे. मला वाटते की ज्याची गोलंदाजी किंवा फलंदाजी चांगली असेल त्याला खेळण्याची संधी देण्यात यावी. कारण त्याला कठीण प्रसंगी यश मिळेल आणि तो क्षेत्ररक्षणात फिट असेलच. आपण हळू हळू खेळाडूची फिटनेस सुधारू शकतो ”
हेही वाचा-
–आयपीएलमधून बाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरने दिल्लीच्या नवनियुक्त कर्णधार रिषभ पंतला अशा दिल्या शुभेच्छा
–मला पुन्हा कर्णधार केलं नाही तर कर्णधारपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर पाहा काय दिलंय स्मिथने उत्तर
–क्रिकेट ऑस्ट्रेलियातील या दिग्गज व्यक्तीने स्टिव स्मिथला पुन्हा कर्णधार करण्यास दिलाय नकार