सध्या भारतीय संघातील क्रिकेटपटू कमालीचे तंदुरुस्त असल्याचे दिसून येते. सर्वच खेळाडू आपल्या तंदुरुस्तीवर मेहनत घेताना दिसतात. आधी एमएस धोनी व त्यानंतर विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असताना भारतीय खेळाडूंना तंदुरुस्तीची ही सवय लागल्याचे दिसते. मात्र, त्याचवेळी काही खेळाडू हे दुखापदग्रस्त देखील होतात. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने आता याच मुद्द्यावर एक वादग्रस्त विधान केले आहे.
भारतीय खेळाडू प्रत्येक वेळी जिममध्ये असलेले दिसून येतात. याची छायाचित्रे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. भारतीय खेळाडू वजन उचलून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतात. नेमका हाच मुद्दा वीरेंद्र सेहवाग याने उचलला. वेटलिफ्टींगमूळे भारतीय खेळाडूंना दुखापत होत असल्याचे त्याने म्हटले. एका युट्यूब चॅनललर बोलताना सेहवाग म्हणाला,
“मला वाटते की, क्रिकेटमध्ये वेटलिफ्टिंगला कोणतेही स्थान नाही. वेटलिफ्टिंगने तुमची ताकद नक्कीच वाढेल मात्र त्यामुळे शरीर कठोर बनेल. यापेक्षा तुम्ही खेळ सुधारण्यासाठी आवश्यक असलेले व्यायाम करायला हवेत. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, गौतम गंभीर, युवराज सिंग व एमएस धोनी हे खेळाडू कधीही पाठीच्या दुखण्यामुळे संघाबाहेर झाले नाहीत.”
भारतीय संघातील अनेक खेळाडूंना पाठीचे दुखणे झाले यामागे हेच वेटलिफ्टिंग असल्याचा दावा सेहवाग याने केला. इतर जण करतात म्हणून तुम्हीही अशाच प्रकारचे व्यायाम करायला हवे हे साफ चुकीचे आहे, असे सेहवागने म्हटले.
भारतीय संघाचा उपकर्णधर हार्दिक पंड्या हा मोठ्या कालावधीसाठी पाठ दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर होता. तसेच, जसप्रीत बुमराह हा देखील सहा महिन्यांपासून कोणतेही क्रिकेट खेळलेला नाही. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली असून तो पुनरागमन करण्यासाठी आणखी काही कालावधी घेऊ शकतो.
(Virendra Sehwag Said Weightlifting Is Not Suitable For Cricketers It’s Sustain Injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: पहिला वनडे सामना सोडून मेव्हण्याच्या लग्नात रोहितने लावले ठुमके, पत्नी रितिकानेही दिली साथ
‘मी सुरेश रैना आहे, शाहिद आफ्रिदी नाही’, रैनाने का उडवली पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची खिल्ली?