इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी (दि. 17 एप्रिल) 24वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने शानदार प्रदर्शन करत 8 धावांनी विजय मिळवला. एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवरील सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी अखेरच्या काही षटकांमध्ये अचूक मारा करत संघाचा विजय साकार केला. मात्र, असे असतानाही भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने गोलंदाजांवर हलकीफुलकी टीका केली आहे.
चेन्नईच्या गोलंदाजी आक्रमणात यावेळी युवा गोलंदाजांचा अधिक भरणा दिसून येतो. राजवर्धन हंगरगेकर, तुषार देशपांडे व मथिशा पथराणा यांच्यासारखे युवा वेगवान गोलंदाज संघात खेळतायेत. मोक्याच्या क्षणी उत्कृष्ट कामगिरी करत असले तरी, त्यांच्या गोलंदाजी सातत्य नाही. हे सर्वच गोलंदाज अतिरिक्त धावा देताना अधिक वेळही घेत आहेत. याच मुद्द्याला धरून बोलताना सेहवाग म्हणाला,
“मला हे स्पष्टपणे दिसत आहे की धोनी त्याच्या गोलंदाजांवर खुश नाही. कारण हे गोलंदाज वाईड आणि नो चेंडू अधिकच टाकत आहेत. गोलंदाजांच्या अशा कामगिरीमुळे धोनीला धोका निर्माण होऊ शकतो. एखाद वेळेस संघाला धोनीविना सामन खेळावा लागेल.”
नियमानुसार कोणताही संघ दोन पेक्षा अधिक वेळा षटकांची गती राखू न शकल्यास त्या कर्णधाराला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात येते. धोनीने आपल्या खेळाडूंच्या अशा गोलंदाजीवर नाराजी व्यक्त केली होती. लखनऊ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी तब्बल 18 अतिरिक्त धावा दिलेल्या. त्यानंतर धोनीने मजेत म्हटले होते की, तुम्ही अशीच गोलंदाजी करत राहिला तर तुम्हाला दुसऱ्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळावे लागेल.
(Virendra Sehwag Talk About Dhoni Suspension For Slow Over Rate In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पदार्पण अर्जुनचे, पण मैफील लुटली वडील सचिन तेंडुलकरने, ‘दादा’ अन् बच्चनला रिप्लाय देत म्हणाला…
जेवणासाठी तिलक वर्माच्या घरी पोहोचला मुंबईचा आख्खा संघ! स्वतः सचिननही होता उपस्थित