---Advertisement---

टीव्हीवर सचिन तेंडुलकरची फलंदाजी बघून सेहवाग शिकला ‘हा’ फटका, स्वत: विरुनेच केलाय खुलासा

On: गुरूवार, जून 10, 2021 5:46 PM
Virender Sehwag and Sachin Tendulkar
---Advertisement---

पूर्वी भारतीय फलंदाजांना इंग्लिश टीकाकार बऱ्याच कुत्सितपणे ‘डल डॉग्स’ म्हणत. कारण भारतीय फलंदाज कमीगतीने खेळत. परंतु एका भारतीय फलंदाजाने भारतीय संघाला आक्रमकतेची नवी व्याख्या शिकवली, आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून नजफगडचा सुलतान वीरेंद्र सेहवाग होय.

वीरेंद्र सेहवाग एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो, त्याने भारतीय संघाला आपल्या विस्फोटक फलंदाजीने अनेक विजय मिळवून दिले. भारतीय क्रिकेट इतिहासात सेहवागच्या अनेक खेळी सुवर्णाक्षरांनी लिहिलेल्या सापडतील. आणि आजकाल तो समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो.

सेहवागने आता या गोष्टीचा खुलासा केला आहे की तो महान दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीची नक्कल करायचा. सेहवागने भारतासाठी बरीच वर्षे सलामीवीर म्हणून फलंदाजी केली आहे. तसेच त्याने सांगितले की, सचिनची फलंदाजी बघून त्याने खूप गोष्टी आत्मसात केल्या.

विरुने सांगितले की, ‘1992 साली त्याने पहिल्यांदा सचिनला फलंदाजी करतांना टीव्हीवर बघितले. पुढे त्याने सांगितले की, जर तुम्ही मैदानावर सुरू असलेला खेळ बघता तेव्हा तुम्हाला खूप काही शिकायला मिळते. माझेच उदाहरण घ्यायचे झाल्यास मी 1992 च्या विश्वचषक स्पर्धेपासून क्रिकेट बघायला सुरवात केली आणि मी सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीची नक्कल करायचा प्रयत्न करायचो की कशाप्रकारे सचिन स्ट्रेट ड्राईव्ह लगावतो किंवा बॅकफूट पंच मारतो. 1992 साली सचिनला टीव्हीवर बघून मी बऱ्याच गोष्टी शिकलो.’

सेहवागने पुढे सांगितले की, ‘आता वेळ बदलली आहे आणि आपण आपल्या आवडत्या फलंदाजाचे व्हिडिओ बघून खूप गोष्टी शिकू शकतो, परंतु आमच्या काळात अशी सुविधा नव्हती की, आम्ही ऑनलाइन संवाद साधून किंवा विडिओ पाहून गोष्टी शिकू. जर अशी सोय असती तर मी नक्कीच बऱ्याच गोष्टी शिकलो असतो.’

सेहवागला भारतीय संघाचा विस्फोटक सलामीवीर म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी भारतीय संघासाठी 104 एकदिवसीय सामने, 251 कसोटी सामने आणि 19 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत प्रतिनिधित्व केले. कसोटीत त्याच्या नावावर 23 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15 शतक आहेत. तसेच कसोटी क्रिकेट मध्ये त्याच्या नावावर 2 त्रिशतक व एकदिवसीय सामन्यात एक द्विशतक आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

श्रीलंका दौऱ्यावर ‘द वॉल’च्या पलटणची भरमार, फलंदाजी ते क्षेत्ररक्षण प्रशिक्षक सर्व द्रविडच्या पसंतीचे

दुसऱ्या कसोटीतून ऐनवेळी न्यूझीलंडच्या ‘या’ अनुभवी खेळाडूची माघार, पाठीच्या दुखण्याने खाल्ली उचल

‘रिषभ पंत खूप जास्तच आत्मविश्वासी आहे,’ पाहा असे का म्हणाले न्यूझीलंडचे प्रशिक्षक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---