मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मंगळवारी (२० एप्रिल) अटीतटीचा सामना पहायला मिळाला. या सामन्यात युवा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करणाऱ्या अमित मिश्राबद्दल माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने एक मजेशीर गोष्ट सांगितली आहे.
मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अमित मिश्राने उल्लेखनीय गोलंदाजी करत ४ षटकात अवघ्या २४ धावा देत ४ गडी बाद केले होते. या कामगिरीच्या बळावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. या सामन्यानंतर माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने एक मजेशीर सांगत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. ही गोष्टी २००८ आयपीएल हंगामातील आहे, जेव्हा अमित मिश्राने चक्क दिल्लीचा संघाचा तत्कालिन कर्णधार वीरेंद्र सेहवागला वेतनात वाढ करा अशी इच्छा व्यक्त केली होती.
सेहवागने म्हटले की, “डेक्कन चार्जर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हॅट्रिक घेतल्यानंतर मी मिश्राला विचारले होते की, तुला काय हवं आहे? यावर तो (अमित मिश्रा) म्हणाला होता की, वीरू भाई, कृपया माझ्या वेतनात वाढ करून द्या.”
यावर आता सेहवागने म्हटले आहे की, “आता त्याला इतका पैसे मिळत आहे की, त्याने अजून एकदा हॅट्रिक केली तरी तो वेतनात वाढ करा असे म्हणणार नाही.”
वीरेंद्र सेहवाग आणि अमित मिश्रा या दोघांनीही सोबत भरपूर क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे सेहवागला त्याचा स्वभाव चांगलाच माहीत आहे. त्याने पुढे म्हटले की, “अमित मिश्रा खूप शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. तो खूप लवकर सर्वांमध्ये मिसळून जातो. त्यामुळे संघातील खेळाडू त्याच्या खूप जवळचे होऊन जातात. जेव्हा त्याच्या गोलंदाजीवर फलंदाज तुफान फटकेबाजी करतात तेव्हा संघातील इतर खेळाडूंना देखील तितकेच वाईट वाटते. तसेच जर त्याला गडी बाद करण्यात यश आले तर संघातील इतर खेळाडूही तितकेच खुश होत असतात.”
महत्त्वाच्या बातम्या-
मिश्राजींपुढे मुंबईचे लोटांगण, भल्याभल्या फलंदाजांच्या ‘अशा’ चटकावतो विकेट्स; स्वत:च केला उलगडा