22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान कोलकाता (Kolkata) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात दिवस-रात्र कसोटी सामना (Day-Night Match) होणार आहे. हा भारताचा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना आहे.
या सामन्याबद्दल भारतीय संघाचा कसोटीतील सलामीवीर फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) विविध मते मांडली आहेत.
या सामन्यात पहिल्यांदा एसजी कंपनीच्या गुलाबी चेंडूचा (Pink Ball) अधिकृतरित्या वापर केला जाणार आहे.
“मी यापूर्वी दुलीप ट्राॅफीमध्ये (Dulip Trophy) गुलाबी चेंडूने खेळलो आहे. तो चांगला अनुभव होता. घरच्या मैदानावर गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव फायदेशीर असू शकतो,” असे बीसीसीआयशी (BCCI) बोलताना पुजारा म्हणाला.
अनेक भारतीय संघातील खेळाडू त्यांच्या कारकीर्दीत पहिल्यांदा गुलाबी चेंडूने खेळतील. तर, चेतेश्वर पुजारा, मयंक अगरवाल, हनुमा विहारी आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या खेळाडूंंना दुलीप ट्राॅफीमध्ये कुकाबूराच्या गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव आहे.
“दिवसा खेळताना सूर्यप्रकाशाचा त्रास होणार नाही. परंतु, सूर्यास्तच्या वेळी खेळताना समस्या निर्माण होऊ शकते. सूर्यास्ताच्या सत्रातील खेळ खूप महत्त्वाचा असेल,” असे गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव असणारा पुजारा म्हणाला.
“एक फलंदाज म्हणून माझा अनुभव चांगला होता. परंतु, मी इतर खेळाडूंना याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, लेग स्पिनरच्या गोलंदाजीवर खेळताना विशेषत: गुगली चेंडू समजने अवघड होते,” इतर खेळाडूंच्या प्रतिक्रिया बद्दल पुजारा असे म्हणाला.
त्याचबरोबर भारताचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) म्हणाला की, परिस्थितीशी सांमजस्य बनवायचे असेल. तर, सामन्यापूर्वी सराव करणे महत्त्वाचे ठरेल.
“मी या सामन्यासाठी खूप उत्सुक आहे. हे एक नवे आव्हान असेल. पुढे काय होईल हे सध्यातरी माहिती नाही. परंतु, हा सामना खेळल्यानंतरच माहिती होईल. सामन्यापूर्वी दोन-तीन वेळा सराव केल्यानंतर गुलाबी चेंडूबद्दल समजेल. तसेच, गुलाबी चेंडू किती स्विंग करतो आणि दर सत्रामध्ये काय बदल होतात तेही समजेल,” असे रहाणे म्हणाला.
“चेंडू उशिराने आणि शरीराच्या जवळ आल्यानंतर खेळणे महत्त्वाचे ठरेल. मला नाही वाटत की आपल्याला गुलाबी चेंडूला आत्मसात करण्यासाठी समस्या येईल,” असेही रहाणे पुढे म्हणाला.
बांगलादेशच्या संघाने आतापर्यंत फक्त एकच प्रथम श्रेणी सामना गुलाबी चेंडूने खेळला आहे.
रविवारी (10 नोव्हेंबर) चिन्नास्वामी स्टेडियममध्ये (Chinnaswamy Stadium) भारतीय संघातील काही खेळाडूंनी एसजी कंपनीच्या गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात सराव केला होता.
यामध्ये मयंक अगरवाल, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी माजी कर्णधार आणि एनसीए प्रमुख राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) देखरेखीखाली नेट मध्ये सराव केला होता.
दिवस-रात्र कसोटीच्या तयारीसाठी टीम इंडियाने केली ही खास मागणी!
वाचा – https://t.co/5nIUeQGUtm#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #daynighttest #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) November 12, 2019
बांगलादेश विरुद्ध शानदार कामगिरी करणारे श्रेयस अय्यर, शिवम दुबे आता खेळणार या स्पर्धेत!
वाचा 👉 https://t.co/AIAtdFh1DA 👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 12, 2019