सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथा कसोटी सामना आज(7 जानेवारी) पाचव्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.
या मालिकेत भारताने अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात आणि मेलबर्नला झालेल्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. तर पर्थ येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने पराभव पत्करला होता.
तसेच सिडनी येथील चौथा सामना अनिर्णित राहिल्याने भारताने ही मालिका आपल्या नावावर केली आणि पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला.
त्याचबरोबर भारत ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका जिंकणारा एकूण पाचवा संघ ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियन भूमीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम इंग्लंड, विंडीज, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघानी केला आहे.
भारताची ऑस्ट्रेलियन भूमीतील ही 12 वी कसोटी मालिका होती. मागील 11 कसोटी मालिकांपैकी भारताने 8 मालिकांमध्ये पराभव स्विकारला आहे तर 3 मालिकांमध्ये बरोबरी केली आहे.
इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये 42 कसोटी मालिकांपैकी 14 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. तर न्यूझीलंडने 12 कसोटी मालिकांपैकी 1 कसोटी मालिका जिंकली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने 11 कसोटी मालिकांपैकी 3 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. तसेच विंडीजने 15 कसोटी मालिकांपैकी 4 कसोटी मालिका जिंकल्या आहेत.
या देशांनी जिंकल्या आहेत या ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका –
13 वेळा – इंग्लंड ( 1882-83, 1884-85,1887, 1888, 1894-95, 1903-04, 1911-12, 1928-29, 1932-33,1954-55, 1970-71, 1978-79, 1986-87, 2010-11)
4 वेळा – विंडीज (1979-80, 1984-85, 1988-89 & 1992-93)
3 वेळा – दक्षिण आफ्रिका (2008-09, 2012-13, 2016-17)
1 वेळा – न्यूझीलंड (1985-86)
1 वेळा – भारत (2018-19)
महत्त्वाच्या बातम्या-
–रिकी पॉटींगचे टीम इंडियाबद्दलचे ३ अंदाज चुकले
–२९८५ दिवसांनी तो महान क्रिकेटर करतोय वनडेत कमबॅक
–…आणि चेतेश्वर पुजाराला नाचावे लागले, पहा व्हिडिओ