---Advertisement---

टी२० ब्लास्टमध्ये ‘सॉल्ट ऍण्ड पेपर’चा तडका, पाहा दोन्ही खेळाडूंमधील मजेशीर लढत

On: शनिवार, जुलै 9, 2022 11:19 AM
---Advertisement---

सध्या व्हायटालिटी टी२० ब्लास्ट (Vitality T20 blast) स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत. यामध्ये एसेक्स आणि लंकाशायर यांच्यात तिसरा उपांत्यपूर्व सामना रंगला. हा सामना लंकाशायरने ७ विकेट्स आणि २६ चेंडू शिल्लक राखत जिंकला. यावेळी सामन्यादरम्यान एक अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे नमुना पाहायला मिळाले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यातच लंकाशायरचा फिलीप सॉल्ट आणि एसेक्सचा मायकल पेपर हे पण चर्चेत आले आहे. कारण दोघांनी एकमेकांना बाद करण्यात महत्वाची भुमिका बजावली आहे.

एसेक्स संघाने सॉल्टला बाद करण्यास पेपरने कशाप्रकारे योगदान दिले याचा व्हिडिओ ट्विटवर शेयर केला आहे. याला त्यांनी ‘सम ऍबसोल्युट सॉस फ्रॉम पेपर टू रीमूव्ह सॉल्ट’, असे कॅप्शन दिले आहे.

लंकाशायरच्या डावात फिलीप सॉल्ट सलामीसाठी आला. त्याने २१ चेडूंत २७ धावा केल्या. यामध्ये त्याने ३ चौकार मारले आहेत. यावेळी ९वे षटक टाकण्यासाठी मॅट क्रिचले गोलंदाजीसाठी आला असता, क्रिजवर सॉल्ट होता. त्याने मारलेल्या शॉटने चेंडू वर गेला असता, सीमारेषेवर असणाऱ्या पेपरने तो घेतला होता, मात्र त्याला तोल सांभाळता न आल्याने त्याने सीमारेषेपार जाण्यासाठी चेंडू हवेत फेकला. ऍलिसनकडे तो चेंडू अप्रतिमरित्या घेत सॉल्टला बाद केले. अशाप्रकारे सॉल्टला बाद करण्यात पेपरची भुमिका स्पष्ट झाली आहे.

 

या सामन्यात मायकल पेपर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला असता. तो ३६ धावांवर असताना सॉल्टने त्याला यष्टीचीत केले आहे. यावेळी १३व्या षटक टाकण्यास टॉम हार्टले आला. त्याच्या तिसऱ्या चेंडूत पेपरने षटकार खेचला. त्याच्या पुढच्याच चेंडूत पेपरने तसाच शॉट मारण्याचा प्रयत्न केला,  मात्र त्याने आपली विकेट गमावली. पेपरने २८ चेंडूत २ चौकार आणि २ षटकाऱ्याच्या साहाय्याने ३६ धावा केल्या आहेत.

 

ओल्ड ट्रॅफोर्ड, मॅनचेस्टर येथे झालेल्या या सामन्यात इसेक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी एसेक्सने ५ विकेट्स गमावत १६१ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना लंकाशायरने ३ विकेट्स गमावत हा सामना जिंकला आहे. या विजयाने ते उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले आहेत. हा सामना ते यॉर्कशायर विरुद्ध १६ जुलैला खेळणार आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वीच रोहितच्या ‘डोक्याला शॉट’, म्हणत असेल संघात कोणाकोणाला घेऊ?

काल आलेला दीपक हुड्डाही ठरतोय विराटपेक्षा वरचढ! रेकॉर्डवर टाका नजर

भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी मालिका विजयाची संधी! पण ‘या’ अडचणी पार कराव्या लागणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---