---Advertisement---

कोरोनाने घेतला आणखी एका क्रिकेटरचा बळी; राजस्थानचा रणजीपटूने अवघ्या ३६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

On: गुरूवार, मे 6, 2021 7:53 PM
---Advertisement---

राजस्थानचा फिरकीपटू विवेक यादव याचे वयाच्या 36 व्या वर्षी बुधवारी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून विवेक यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त होता. मिळालेल्या माहितीनुसार विवेकला कोरोनाचा संसर्ग देखील झाला होता.

साल 2008 मध्ये राजस्थानकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर विवेक 2010 -2011 च्या मोसमात राजस्थानच्या रणजी करंडक विजेत्या संघाचा भाग होता. तसेच बडोद्याविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने 4 विकेट्स देखील घेतल्या होत्या. 134 धावांत 6 गडी बाद करने ही त्याची कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी होती.

विवेक 2012 साली दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग होता. विवेकने राजस्थानकडून 18 प्रथम श्रेणी, 8 अ दर्जाचे तसेच 4 टी20 सामने खेळले आहेत. विवेक राजस्थानचा स्थानिक क्रिकेटमधील महत्त्वाचा खेळाडू होता. 2010-11 च्या मोसमात हृषिकेश कानिटकर यांच्या नेतृत्वात तो संघाचा नियमित सदस्य असायचा.

भारताच्या 19 वर्षांखालील आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत असलेल्या आकाश सिंगसारख्या तरूण खेळाडूंना त्याचे मार्गदर्शन लाभलेले आहे. त्याने जयपूरमध्येच क्रिकेट अकॅडमीची सुरूवात केली होती.

विवेकला त्याचे मित्र आणि संघाचे माजी सहकारी एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ओळखतात. अनेकांनी प्रतिक्रिया देत विवेक हा नेहमी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार असायचा अशी त्याची ओळख सांगितली आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनने त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विवेकच्या मागे त्याची पत्नी आणि मुलगी आहे.

राजस्थान क्रिकेटसाठी या आठवड्यातली ही दुसरी दुःखद बातमी आहे. यापूर्वी राजस्थान क्रिकेटमध्ये टायगर म्हणून प्रसिद्ध असलेले 89 वर्षांचे किशन रुंगटा यांचे विवेकच्या आधी निधन झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ कारणामुळे कोरोनाची लागण झालेल्या माईक हसी, बालाजीला एअर ॲम्ब्युलन्सद्वारे हलवण्यात आले चेन्नईत

आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाली असली तरी लवकरच ‘ही’ मोठी स्पर्धा येणार क्रिकेट चाहत्यांच्या भेटीला

विलियम्सनसह ‘या’ ४ सदस्यांना भारतात ठेऊन न्यूझीलंडचे अन्य खेळाडू मायदेशी रवाना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---