---Advertisement---

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचे प्रायोजकत्व देखील VIVO कडेच राहणार : ब्रिजेश पटेल

---Advertisement---

चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांकित हॉटेलमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव सुरू झाला आहे. एकीकडे लिलावाचा थरार चालू असताना दुसरीकडे आयपीएलने टायटल स्पॉन्सरची घोषणा केली आहे. व्हिवो कंपनीला आयपीएल २०२१चे स्पॉन्सरशीप परत देण्यात आले असून आयपीएलच्या गवर्निंग काउंसिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी यांसदर्भात घोषणा केली आहे.

स्टार स्पोर्टशी यासंदर्भात बोलताना पटेल म्हणाले की, व्हिवो परत आला आहे. भारत आणि चीनमध्ये चालू असलेल्या वादामुळे व्हिवो कंपनीलाच आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे टायटल स्पॉन्सरशीप देण्यात आले आहे. गतवर्षी ड्रिम ११ ने केलेल्या खर्चाच्या रक्कमेपेक्षा दुप्पट खर्च यावर्षी व्हिवो करणार आहे.

याबरोबरच पुढे बोलताना पटेल यांनी सांगितले की, गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आयपीएलचा पूर्ण हंगाम बंद दारामागे अर्थाच प्रेक्षकांविना खेळवला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विरेंद्र सेहवागचा भाचा उतरला आयपीएल लिलावात, ‘या’ नवख्या खेळाडूंनाही मिळाली संधी

आयपीएल लिलाव : शाकिब अल हसनवर लागली कोट्यावधी रुपयांची बोली, ‘या’ संघात झाला सामील

मार्केटमध्ये ‘मॅक्स’ भाऊचा दरारा कायम.! मॅक्सवेलवर १४.२५ कोटींची विक्रमी बोली, ‘या’ संघाने घेतले ताफ्यात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---