दूरसंचार ऑपरेटर कंपनी व्होडाफोन-आयडिया (व्हीआय) आगामी ड्रीम ११ आयपीएल २०२० ची सह प्रायोजक बनली आहे. आयपीएल २०२० चा हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार आहे. शनिवारी कंपनीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत यापूर्वी व्होडाफोन आणि आयडियाची काहीशी गुंतवणूक होती. पण व्होडाफोन आयडियाने ऑगस्ट २०१८ मध्ये विलीनीकरणानंतर प्रायोजकत्वाच्या करारावर स्पॉन्सरशिप डील साइन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही कंपनी आता ‘व्हीआय’ या ब्रँड नावाने कार्यरत आहे.
टी२० प्रीमियर लीगच्या थेट प्रक्षेपणसाठी सहप्रायोजकत्वाचे अधिकार व्हीआय यांना मिळाले आहेत. यावर्षी आबूधाबी युएईमध्ये ड्रीम ११ आयपीएल २०२० होणार आहे. याचे टेलीकास्टिंग स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे.
ड्रीम ११ ने आयपीएल २०२० ची स्पॉन्सरशिप २२२ कोटी रुपयांमध्ये मिळवली आहे. कारण याआधी भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमा वादामुळे विवोने स्पॉन्सरशिप मागे घेतली होती.
परंतु व्हीआयने स्टार स्पोर्ट्सच्या सह-प्रायोजक कराराशी संबंधित आर्थिक आकडेवारीचा उल्लेख केलेला नाही. या आठवड्याच्या सोमवारी व्होडाफोन आयडियाने भारतात आपली नवीन ब्रँड ओळख सुरू केली आहे.
कंपनीने सोमवारी जाहीर केले की, ती आता ‘व्हीआय’ म्हणून ओळखली जाईल. जूनच्या आकडेवारीनुसार कंपनीचे भारतात सुमारे २८० मिलियन ग्राहक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-आरसीबीचा कर्णधार विराटने ‘या’ गोष्टीवर आधीपासूनच लक्ष दिले असते तर आज…
-ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यात आज दुसरा वनडे सामना; जाणून घ्या सर्वकाही…
-‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया लवकरच तुम्हाला तुमची चुक कळेल,’ भारतीय दिग्गजाने साधला थेट बोर्डावर निशाणा
ट्रेंडिंग लेख-
-दुसऱ्या काळात जन्न्मला असता, तर तो भारताचा अव्वल फिरकीपटू असता
-हेअरबँड घालून ऑस्ट्रेलियाला दोन-दोन विश्वचषक जिंकून देणारा दुर्लक्षित शिलेदार
-इरफानला एकाच ओव्हरमध्ये २४धावा कुटणारा ‘ज्युनियर सेहवाग’ आयपीएल गाजवायला सज्ज