दक्षिण आफ्रिका येथे आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने ऐतिहासिक निर्णय घेतला. विशेष म्हणजे, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व सामन्यात महिला पंच दिसणार आहेत. आयसीसीने मागील काही दिवसांपूर्वीच याची घोषणा केली होती. 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी यादरम्यान पार पडणाऱ्या या स्पर्धेत 10 पंच आणि 3 सामना अधिकारींच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, एका भारतीय महिलेने विक्रम रचला आहे.
महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेत (Women’s T20 World Cup 2023) मैदानावरील पंच बनणारी वृंदा राठी (Vrinda Rathi) ही पहिली भारतीय महिला बनली आहे. विशेष म्हणजे, वृंदाने बोलँड पार्क, पार्ल येथे पार पडलेल्या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात मैदानी पंचाची भूमिका निभावली. हा सामना वेस्ट इंडिज महिला विरुद्ध इंग्लंड महिला (West Indies Women vs England Women) संघात पार पडला.
विशेष म्हणजे, निमाली परेरा (Nimali Perera) यादेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मैदानात पंचगिरी करणाऱ्या श्रीलंकेच्या पहिल्या महिला ठरल्या. यापूर्वी दोघींनीही महिला आशिया चषक स्पर्धेत पदार्पण केले होते. वृंदा आणि निमाली या त्यांच्या देशांसाठी पहिल्या महिला आंतरराष्ट्रीय पंच बनल्या होत्या.
आयसीसीने नेमलेल्या 3 सामना अधिकाऱ्यांमध्ये भारतीय महिला पंच जीएस लक्ष्मी (GS Lakshmi) यांचाही समावेश आहे. त्यांच्याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेच्या शांद्रे फ्रिट्झ आणि श्रीलंकेच्या मिचेल परेरा यांचा समावेश आहे.
भारताचा पहिला सामना
स्पर्धेतील भारतीय महिला (India Women) संघाचा पहिला सामना पाकिस्तान महिला (Pakistan Women) संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना रविवारी (दि. 12 फेब्रुवारी) न्यूलँड्स, केपटाऊन येथे पार पडणार आहे. (Vrinda Rathi becomes first Indian woman to officiate as on-field umpire in Women’s T20 World Cup 2023 read here)
आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी पंचांची अधिकृत यादी-
सामना अधिकारी-
जीएस लक्ष्मी (भारत), शांद्रे फ्रिट्झ (दक्षिण आफ्रिका), मिचेल परेरा (श्रीलंका)
पंच-
स्यू रेडफर्न (इंग्लंड), एलॉइस शेरिडन (ऑस्ट्रेलिया), क्लेअर पोलोसाक (ऑस्ट्रेलिया), जॅकलिन विलियम्स (वेस्ट इंडिज), किम कॉटन (न्यूझीलंड), लॉरेन एजेनबॅग (दक्षिण आफ्रिका), ऍना हॅरिस (इंग्लंड), वृंदा राठी (भारत), एन जननी (भारत), निमाली परेरा (श्रीलंका).
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीयांनो सावधान! दिल्ली काबीज करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मायदेशातून बोलावला मर्फीसारखाच आणखी एक स्पिनर
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारत पाकिस्तानला धूळ चारणार का? जाणून घ्या आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते