30 मेपासून आयसीसीच्या 12 व्या क्रिकेट विश्वचषकाची स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे आता या विश्वचषकाच्या दृष्टीने सर्वच संघांनी योजना आखायला सुरुवात केली आहे. तसेच हा विश्वचषक जसा जवळ येत आहे तशा चर्चाही रंगू लागल्या आहेत.
अनेक क्रिकेट तज्ञांनी तसेच माजी क्रिकेटपटूंनी अनेक तर्कवितर्कही या विश्वचषकाबद्दल लावले आहेत. यात आता भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणचाही समावेश झाला आहे. त्याने या विश्वचषकासाठी त्याच्या दृष्टीने भारताचा संघात कोणाला स्थान मिळावे आणि कोणाला नाही याबद्दल मते मांडली आहेत.
विश्वचषकासाठी एमएस धोनीसह दुसरा यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत असे पर्याय भारताकडे आहेत. त्यामुळे यावर सध्या भारतीय क्रिकेट जगतात चर्चा होत आहे.
याबद्दल लक्ष्मणने स्टार स्पोर्ट चॅनेलला त्याच्या विश्लेषणानुसार सांगितले की विश्वचषक ही खूप महत्त्वाची स्पर्धा आहे. त्यामुळे अनुभवाच्या जोरावर रिषभ पंतच्या ऐवजी दिनेश कार्तिकला संधी देण्यात यावी.
पंत मागील काही सामन्यात मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला आहे. त्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये मागील 5 डावात 4, नाबाद 40, 28, 3 आणि 1 अशा धावा केल्या आहेत.
याबरोबरच लक्ष्मणने विश्वचषकासाठी त्याच्या दृष्टीने भारताचा संघात चार वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांना प्राधान्य दिले आहे. फिरकी गोलंदाजांमध्ये त्याने युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांचा विचार केला आहे. तर मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि भुवनेश्वर कुमार हे वेगवान गोलंदाजांच्या फळीत आहेत.
असा आहे व्हिव्हिएस लक्ष्मणचा विश्वचषकासाठी भारताचा संभाव्य संघ –
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अंबाती रायडू, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, केएल राहुल, दिनेश कार्तिक, खलील अहमद.
महत्त्वाच्या बातम्या-
–हा खेळाडू विश्वचषक २०१९मध्ये टीम इंडियासाठी ठरणार जायंट किलर
–काल क्रिकेटविश्वातील या ५ ट्वीटची झाली सर्वाधिक चर्चा
–म्हणून मराठमोळ्या केदार जाधवने मानले कूल धोनीचे आभार