काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने भारताचा कर्णधार विराट कोहलीविषयी मोठे विधान केले होते. त्याच्या या विधानाला प्रत्युत्तर देत भारतीय संघाचा माजी कर्णधार व्हीव्हीएस लक्ष्मणने क्लार्कवरती टीका केली आहे.
क्लार्कने काही दिवसांपूर्वी विराटविषयी बोलताना असे म्हटले होते की, आयपीएल करारात आपले स्थान टिकवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी मुद्दाम कोहलीबद्दल अपशब्द वापरण्याचे टाळले होते. क्लार्कच्या या विधानाला उत्तर देत लक्ष्मणने त्याच्यावर टीका (Criticize) केली की, कोहलीशी चांगला व्यवहार करण्याचा अर्थ असा नाही की त्या खेळाडूला इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) स्थान मिळेल.
लक्ष्मण आयपीएलच्या सनराइजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा मार्गदर्शक आहे. त्यांने स्टार स्पोर्ट्सवरील क्रिकेट कनेक्टेड या शोमध्ये सांगितले की, “जर तुम्ही कुणासोबत चांगला व्यवहार करत असाल तर, त्याचा अर्थ असा नाही होत की तुम्हाला आयपीएलमध्ये जागा मिळेल.”
“आयपीलमधील कोणताही संघ खेळाडूतील क्षमता बघेल, जे त्यांच्या संघासाठी फायदेशीर ठरेल. तसेच, त्यांच्या विजयालाही त्यामुळे हातभार लागेल. अशाच खेळाडूंना आयपीएलच्या (IPL) करारात स्थान दिले जाते. त्यामुळे कुणासोबतचे चांगले वर्तन तुम्हाला आयपीएलमध्ये स्थान मिळवून देऊ शकणार नाही,” असेही पुढे लक्ष्मण म्हणाला.
भारताकडून १३४ कसोटी सामने खेळलेल्या लक्ष्मणने म्हटले की, “लिलावादरम्यान जेव्हा मी क्रिकेटपटूंची निवड करतो. त्यावेळी मी अशा खेळाडूंना जास्त महत्त्व देतो ज्यांनी त्यांच्या देशाकडून खेळताना चमकदार कामगिरी केली आहे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-त्या ऐतिहासिक हॅट्रिकची प्लॅनिंग सांगताना शमी म्हणाला…
-एका संघाला विश्वचषक जिंकून दिलेला प्रशिक्षक होणार बडोद्याचा महागुरु
-भारताला १५ वर्षांपुर्वी त्रास देणाऱ्या आफ्रिदीच्या नावावर आजही तो विक्रम कायम