रिषभ पंत याला जास्त संधी का दिली जात आहे? हा प्रश्न सध्या सोशल मिडीयावर सर्वत्र विचारला जात आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर ताशेरेही ओढले जात आहेेत. न्यूझीलंड दौऱ्यावर भारताच्या प्रशिक्षकपदी असणाऱ्या वीवीएस लक्ष्मण यांनी यावर उत्तर दिले. पंत बऱ्याच काळापासून भारतीय संघासोबत आहे. कसोटी क्रिकटमध्ये त्याने भारतासाठी बरेच विस्मरणीय डाव खेळले आहेत. मात्र, मर्यादित षटकांच्या सामन्यांत पंत या प्रदर्शनाची पुनरावृत्ती नाही करु शकला. त्याने खेळलेल्या 29 एकदिवसीय सामन्यात 855 धावा केल्या, ज्यात त्याची सरासरी 35.62 इतकी होती.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात रिषभ पंत (Rishabh Pant) अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करण्यात अपयश आलेे. तरीदेखील त्याला या प्रकारांमध्ये वारंवार संधी देेण्यात येत आहेे. न्यूझीलंड विरुद्ध खेळलेल्या तीन डावांमध्ये त्याने 6,11 आणि 15 धावा केल्या. तसेच टी20 विश्वचषकात तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 27 आणि झिम्बाब्वे विरुद्ध 3 धावा करुन बाद झाला. इंग्लंड विरुद्ध खेळलेेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात त्याला केवळ 6 धावा करता आल्या. संजू सॅमसन (Sanju Samson) आणि ईशान किशन (Ishan Kishan) सारखे खेळाडू सातत्याने चांगले प्रदर्शन करत असून प्लेईंग इलेवनमध्ये आपली दावेदारी सादर करत आहेत. वीवीएस लक्ष्मण (VVS Laxman) याने मात्र आता आपले मौन सोडले आहे.
लक्ष्मणने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, “खेळाडूंना पुरेश्या संधी दिल्या गेल्या पाहिजेत आणि ज्यावेळी संघात त्यांची निवड होत नाही त्यावेळी त्यांना त्याचे कारणम देखील सांगितले पाहिजे. पंतने चौथ्या क्रमांकावर संघासाठी चांगलले प्रदर्शन करत आहे. अजून जास्त वेळ झालेला नाही जेव्हा त्याने ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर धमाकेदार शतक झळकावले होते. त्यामुळे त्याला पाठिंबा देणे गरजेचेे आहे. टी20 क्रिकेटने फलंदाजांनी जास्त आत्मविश्वास दिला आहेे. मैदान कितीही मोठे असले तरी त्यांनी विश्वास असतो की ते आरामशीर षटकार लगाऊ शकतात.”
पंतच्या सततच्या अपयशामुळे त्याच्यावर टीकांची झोंब उठली होती. अशातच वीवीएस लक्ष्मण यासारख्या दिग्गज खेळाडूने पंतची पाठराखण केली आहे. (VVS Laxman has disclosed the reason behind Rishabh Pants selection in playing eleven)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र संघ पहिल्यांदाच विजय हजारेच्या अंतिम फेरीत, ऋतुराज गायकवाडचे शतक सार्थकी
दुष्काळात तेरावा महिना, दीड दशकानंतर पाकिस्तानात आलेल्या इंग्लंड संघावर नामुष्की, सर्वच्या सर्व…