भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक सध्या चांगलेच व्यस्त आहे. केएल राहुलच्या नेतृत्वातील भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. तसेच त्यानंतर लगेच २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये आशिया चषक खेळला जाईल. त्यातील झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच प्रयाण करेल. केएल राहुलच्या नेतृत्वातील या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर १८ ऑगस्ट, २० ऑगस्ट व २२ ऑगस्ट या दिवशी सामने खेळेल.
लक्ष्मण यांच्याकडे ही जबाबदारी देण्याचे कारण म्हणजे आशिया चषकासाठी भारतीय संघ २० ऑगस्ट रोजी उड्डाण करणार आहे. त्या संघासोबत नियमित मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे जातील. झिम्बाब्वे दौऱ्यावर कर्णधार असलेला केएल राहुल व दीपक हुडा हे झिम्बाब्वे दौऱ्यानंतर हरारेवरून थेट दुबई येथे दाखल होतील.
बीसीसीआय सचिव जय शहा यांनी याबाबत माहिती देताना म्हटले, “द्रविड यांना विश्रांती दिली गेली नाही. केवळ दोन्ही संघांना योग्य प्रशिक्षक लाभावेत यासाठी या दोन्ही दिग्गजांकडे दोन वेगवेगळे संघ सोपवले गेलेत.”
व्हीव्हीएस लक्ष्मण हे मागील वर्षीपासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक आहेत. त्यांनी द्रविड यांची जागा घेतली होती. द्रविड हे भारतीय संघासह इंग्लंडमध्ये असताना लक्ष्मण यांनी आयर्लंड दौऱ्यावेळी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली होती.
‘मला आयसीसी स्पर्धांमध्ये खेळायला आवडते!’ स्वत: शिखर धवनने प्रकट केली इच्छा
‘एका हंगामात ४०० धावा करूनही संधी मिळत नसेल तर…’, संघनिवडीवरून नितीश राणा निराश
अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या पहिल्या मौसमातून अनुभवायला मिळणार अस्सल ‘देशी खो खो’चे नव्या रूपात दर्शन