---Advertisement---

‘इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत भुवनेश्वर बजावेल महत्वपूर्ण भूमिका”, माजी भारतीय क्रिकेटपटूचे विधान

On: गुरूवार, मार्च 11, 2021 11:09 AM
bhuvneshwar-kumar
---Advertisement---

येत्या १२ मार्च पासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणांमुळे उपलब्ध नसणार आहे. त्याची उणीव भरून काढण्यासाठी, गेल्या १५ महिन्यापासून संघाबाहेर असलेल्या भुवनेश्वर कुमारला संघात संधी देण्यात आली आहे. अशातच एका माजी भारतीय क्रिकेटपटूने भुवनेश्वर कुमारकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत तो संघासाठी महत्वाचा खेळाडू असल्याचे वक्तव्य केले आहे.

दुखापतीमुळे होता संघाबाहेर 

भुवनेश्वर कुमारने आपला शेवटचा सामना डिसेंबर २०१९ मध्ये खेळला होता. त्यानंतर तो दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. तब्बल १५ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करत असलेल्या भुवनेश्वर कुमारबद्दल बोलतांना माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी म्हणाला, “मला खूप आनंद होत आहे की, भुवनेश्वर पुन्हा एकदा फिट झाला आहे. तो भारतीय संघासाठी महत्वपूर्ण गोलंदाज आहे. विशेषतः मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये.”

“जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त जर कोणाला नवीन चेंडूने गोलंदाजी आणि शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्याचा अनुभव असेल तर तो भुवनेश्वर कुमार आहे”, अशी कौतुकाची पुस्तीही लक्ष्मण याने यावेळी जोडली. बुमराहच्या अनुपस्थितीत आगामी मालिकेत भुवनेश्वर भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करेल.

लक्ष्मणच्या मते ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी

भुवनेश्वर कुमार गेल्या १५ महिन्यांपासून संघाबाहेर आहे. त्याने आपला शेवटचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर २०१९ मध्ये वेस्ट इंडीज संघाविरुद्ध खेळला होता. लक्ष्मणच्या मते भुवनेश्वरला आगामी मालिकेत  २ पेक्षा अधिक सामने खेळायला मिळणार नाही. तसेच लक्ष्मणने रोहित शर्मा सोबत सलामी फलंदाज म्हणून शिखर धवन ऐवजी केएल राहुलला प्राधान्य दिले आहे. त्याच्या मते शिखरला, राखीव फलंदाजाची भूमिका पार पाडावी लागु शकते. आता सामन्यापूर्वी संघ व्यवस्थापन काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे असेल.

पहिल्या टी२० सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ-

विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, भुवनेश्‍वर कुमार, युजवेंद्र चहल.

महत्वाच्या बातम्या:

रिषभ पंत नव्हे तर, या खेळाडूला पहिल्या टी२० सामन्यात कोहली देणार यष्टीरक्षक म्हणून संधी

आयसीसी मधील भारतीय अधिकाऱ्यावर गंभीर आरोप, निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता

कसोटीत दोन्ही डावात शतक करणारे ६ भारतीय दिग्गज फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---