कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार ऑयन मॉर्गनने शेख झायेद स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आयपीएलच्या ३८ व्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी केकेआरच्या खेळाडूंनी आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत चेन्नई समोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, यावेळी सलामीवीर व्यंकटेश अय्यरने एक चुकीचा निर्णय घेतला, त्याचा फटका संघालाही बसला.
शुबमन गिल पहिल्याच षटकात धावबाद झाला. त्याने संघाला आक्रमक सुरुवात करून दिली होती. गेल्या दोन सामन्यांचा नायक सलामीवीर व्यंकटेश अय्यर सीएसके गोलंदाजांसमोर असहाय्य दिसत होता. अय्यरने केवळ आपली विकेट गमावली नाही, तर डीआरएसही वाया घालवून संघाचेही नुकसान केले. त्याला शार्दुल ठाकूरने बाद केले. सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर अय्यर शार्दुल ठाकूरचा बळी ठरला. चेंडू अय्यरच्या बॅटची कड घेऊन धोनीच्या ग्लोव्हजमध्ये गेला आणि पंचानेही क्षणाचाही विलंब न करता बोट वर केले. मात्र, अय्यरने बाद झाल्यानंतरही डीआरएसचा निर्णय घेतला.
https://twitter.com/CowCorner9/status/1442086012025409538?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442086012025409538%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fvenkatesh-iyer-wasted-kkr-drs-against-csk-ipl-2021-video-84439
अय्यरचा घेतलेला डीआरएस पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण रिप्लेमध्ये चेंडू स्पष्टपणे बॅटचा कड घेऊन धोनीच्या हातात गेल्याचे दिसत होते. अशा स्थितीत त्याने केवळ आपली विकेट गमावली नाही, तर संघाचा एक डीआरएस वाया घालवला.
दरम्यान, केकेआरने आजच्या सामन्यात संघात काहीही बदल केलेला नाही, तर सीएसकेने ड्वेन ब्राव्होच्या जागी सॅम करनला संघात आणले आहे. धोनीने आपल्या खेळाडूंचा आणि विशेषतः ड्वेन ब्राव्होसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंचा कामाचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
धोनी म्हणाला, “आजच्या सामन्यात आमच्या संघात एक बदल आहे. ब्राव्होच्या जागी सॅम करण खेळेल. सीपीएलमध्ये त्याला काही किरकोळ दुखापती झाल्या होत्या त्या वाढू नये म्हणून आज त्याला आराम दिला आहे. संघासाठी सपोर्ट स्टाफ खूप महत्वाचा आहे. संघात अनुभवी खेळाडू असल्यास मदत होते.”
तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्स निर्धारित २० षटकात १७१ धावा केल्या आहेत. त्रिपाठी आणि नितीश राणा यांच्या कामगिरीमुळे केकेआर सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला. त्रिपाठीने ४५ आणि राणाने नाबाद ३७ धावांचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
-ज्याने पंजाबच्या तोंडून हिसकावला असता सामना, त्याच खेळाडूचे कर्णधार राहुलने गायले खूप गुणगान
-शमीच्या तेज तर्रार चेंडूने अलगद उडवले केनचे स्टंप्स, व्हिडिओ बघून म्हणाल, नुसता धुरळा…!
-क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?