---Advertisement---

पार्नेलने पंड्याला दिलेला ‘प्रेमाचा’ निरोप चांगलाच गाजलाय!

Wayne-Parnell
---Advertisement---

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात ५ टी-२० सामन्यांची मालिका सूरू आहे. भारतीय क्रिकेट संघाला रविवारी दक्षिण अफ्रिका विरुद्ध कटक येथील बाराबती मैदानावर झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला. दक्षिण अफ्रिकाने हा सामना ४ गडी आणि १० चेंडू राखून जिंकला.

या सामन्यात सर्वात जास्त गाजले ते वेन पार्नेल याने हार्दिक पंड्याचा बळी घेतल्यावंतरचे सेलिब्रेशन. वेन पार्नेल याने हार्दिक पंड्याला त्रिफळाचित केल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारे निरोप देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पार्नेल याने टाकलेल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचित बाद झाला. त्याने हार्दिक पंड्याला बाद करताच हाताने हृदयाचे चिन्ह करुन दर्शवले.

गुरूवारी दिल्ली येथील अरुण जेटली मैदानावर झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात २११ धावांची मोठी मजल मारण्यात हार्दिक पंड्याने केवळ १२ चेंडूत केलेल्या ३१ धावांचा खुप मोठा हात होता. दुसऱ्या टी२० सामन्यात अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला त्याच्याकडुन अशाच काही प्रदर्शनाची आशा होती. मात्र तो त्या आशेवर खरा ऊतरु शकला नाही.

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १४८ धावा केल्या. यामध्ये श्रेयस अय्यरने सर्वाधिक ४० धावा केल्या. ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी एक आकडी धावसंख्येवर विकेट्स गमावल्या. एन्रीच नॉर्कियाने ३६ धावा खर्च करून दक्षिण आफ्रिकी संघासाठी सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

तृतिय श्रेणीत पुणेरी वॉरियर्स, भारती एफसी अंतिम लढत

कर्णधार पंतसह संघातील ‘या’ चार खेळाडूंनी केलंय निराश, पाहा कामगिरी

‘हार्दिक सध्याचा सर्वात वैविध्यपूर्ण खेळाडू’, भारताच्या माजी प्रशिक्षकाने केली पंड्याची प्रशंसा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---