वेल्स फुटबॉल संघाचा कर्णधार व दिग्गज फुटबॉलपटू गॅरेथ बेल याने सोमवारी (9 जानेवारी) सर्व प्रकारच्या फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. मागील महिन्यात पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकात वेल्स संघाला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागलेला. त्यानंतर त्याने आता हा निर्णय घेत सर्वांना चकीत केले आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने याबाबत घोषणा केली.
— Gareth Bale (@GarethBale11) January 9, 2023
बेलने सार्वजनिक केलेल्या निवेदनात म्हटले,
“खूप विचार केल्यानंतर, मी तात्काळ प्रभावाने क्लब फुटबॉल आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर करत आहे.” या पोस्टमध्ये बेलने त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या लोकांचे आभार मानले आहेत.
बेलने त्याच्या कारकिर्दीत पाच वेळा चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली. तसेच रिअल माद्रिदसह तीन वेळा स्पॅनिश लीगचे विजेतेपद पटकावले. रियाल माद्रिद संघात असताना त्याची महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यासह विशेष जोडी जमली होती. याशिवाय तो टॉटनहॅम हॉटस्पर, साऊथॅम्टन या क्लबसाठी देखील खेळला आहे. सध्या तो अमेरिकेत लॉस एंजलिस फुटबॉल क्लबसाठी खेळत होता. वेल्ससाठी सर्वाधिक 111 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे. यामध्ये 41 गोल झळकवण्याची कामगिरी त्याने केली.
सन 2013 मध्ये रियल माद्रिद संघाकडे येण्यासाठी 85.1 मिलियन पाउंड इतकी विश्वविक्रमी रक्कम दिली गेलेली. त्यानंतर रोनाल्डो, बेल व करीम बेंझेमा या तिकडेने क्लब फुटबॉलमध्ये जोरदार कामगिरी करून दाखवलेली.
(Wales Football Captain Gareth Bale Announced Retirement)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘महाराष्ट्र केसरी’ला महिंद्रा थार जीपचे बक्षीस
सूर्याने सांगितले आपल्या ‘सिक्रेट कोच’चे नाव! दिले आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे श्रेय