---Advertisement---

‘नो लूक थ्रो’! श्रीलंकेच्या गोलंदाजाने यष्टीकडे न पाहताच उडवली दांडी, सर्वांना आठवला धोनी

On: गुरूवार, जुलै 29, 2021 3:15 PM
---Advertisement---

बुधवारी (२८ जुलै) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा टी-२० सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघावर ४ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह श्रीलंका संघाने ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. या सामन्यात श्रीलंका संघाचा गोलंदाज वनिंदू हसरंगाने असे काही कृत्य केले होते, जे पाहून क्रिकेट चाहत्यांना एमएस धोनीची आठवण आली असेल.

भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी हा आपल्या चपळतेमुळे नेहमीच चर्चेत असायचा. यष्टिरक्षण करत असताना अनेकदा तो यष्टी न पाहता फलंदाजाला धावबाद करायचा. असाच काहीसा प्रकार दुसऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान पाहायला मिळाला होता. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Wanindu hasaranga did ms dhoni during the 2nd T20I against india)

तर झाले असे की, भारतीय संघ फलंदाजी करत असताना १९ वे षटक टाकण्यासाठी वनिंदू हसरंगा गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर फलंदाज भुवनेश्वर कुमारने सरळ शॉट खेळला होता. त्यावेळी नॉन स्ट्राइकला असलेला फलंदाज नितीश राणाने पहिली धाव वेगाने पूर्ण केली. त्यानंतर दुसरी धाव घेण्यासाठी दोघेही धावले. त्यावेळी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या क्षेत्ररक्षकाने बॉलिंग एंडकडे चेंडू फेकला. तो चेंडू हसरंगाने पकडला आणि यष्टीकडे न पाहता यष्टीला मारला. तो चेंडू यष्टीला लागला परंतु फलंदाज त्यापूर्वीच क्रीजमध्ये पोहोचला होता. त्यामुळे तो नाबाद राहिला.

असाच कारनामा एमएस धोनीने रांचीच्या मैदानावर न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळताना केला होता. मात्र त्यावेळी फलंदाज बाद झाला होता.

श्रीलंका संघाने ४ गडी राखून मिळवला विजय
तसेच दुसऱ्या टी-२० सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ५ बाद १३२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाकडून धनंजय डी सिल्वाने नाबाद ४० धावांची खेळी केली. हा सामना श्रीलंका संघाने ४ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह मालिका १-१ ने बरोबरीवर आली आहे. गुरुवारी (२९ जुलै) या मालिकेतील निर्णायक तिसरा टी-२० सामना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आज उजाळणार ‘या’ ४ भारतीय युवकांचे नशीब, श्रीलंकेविरुद्ध करू शकतात टी२० पदार्पण

मास्टरमाईंड! अन् द्रविडने ड्रेसिंग रूममधून बाहेर येत पाठवला खास संदेश, पण काय होतं त्या चिठ्ठीत?

‘तिचा होकार असल्यास, एका पायावर तयार’; सारासोबत लग्नाच्या प्रश्नावर पाकिस्तानी गोलंदाजाचे भन्नाट उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---