---Advertisement---

मानलं भाई! पहिल्याच विश्वचषकात हसरंगाने मारलं मैदान; पाहा जबरदस्त आकडेवारी

---Advertisement---

युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात सोमवारी (१ नोव्हेंबर) अ गटातील श्रीलंका आणि इंग्लंड संघ आमनेसामने आले. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर ४ बाद १६३ धावा धावफलकावर लावल्या. इंग्लंडच्या फलंदाजांनी सामन्यात वर्चस्व गाजवले असले तरी श्रीलंकेचा प्रमुख फिरकीपटू वानिंदु हसरंगा याने तीन बळी मिळवत आपला शानदार फॉर्म कायम राखला. तसेच या दरम्यान त्याने नवा विश्वचषक विक्रम आपल्या नावे केला.

हसरंगाने मिळवले तीन बळी
या संपूर्ण विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या वनिंदू हसरंगाने या सामन्यातही तीन बळी मिळवत इंग्लंडला धक्के दिले. त्याने आपल्या चार षटकांमध्ये केवळ २१ धावा देत जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो व ओएन मॉर्गन यांना तंबूचा रस्ता दाखवला. या विश्वचषकामध्ये त्याने तिसऱ्यांदा तीन बळी आपल्या नावे केले. त्याने यापूर्वी नेदरलँड्स व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी केलेली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने हॅट्रिक नोंदवलेली.

हसरंगाच्या नावावर नवा विक्रम
वनिंदू हसरंगाने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. या सात सामन्यांमध्ये त्याने आत्तापर्यंत १४ बळी मिळवले आहे. या चौदा बळींसह तो एका टी२० विश्वचषकात सर्वाधिक बळी मिळवणारा लेगस्पिनर ठरला. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी व दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी लेगस्पिनर इम्रान ताहीर यांच्या नावे होता. आफ्रिदीने २००७ व ताहीरने २०१४ विश्वचषकात प्रत्येकी बारा बळी मिळवले होते.

बटलरचे शानदार शतक
शारजा येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पहिल्या १० षटकात ४७ धावांवर तीन बळी मिळविले होते. मात्र, त्यानंतर कर्णधार ओएन मॉर्गन व जोस बटलर यांनी शतकी भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. बटलरने १०१ धावांची शानदार खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

‘…आणि लोकांना रोहित कर्णधार म्हणून हवा आहे’, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर ‘हिटमॅन’ जोरदार ट्रोल

“केवळ विराट नाही, तर संपूर्ण संघ आणि सर्व प्रशिक्षकही अपयशी ठरलेत”

लज्जास्पद! विराट-अनुष्काच्या १० महिन्यांच्या मुलीला आल्या हीन दर्जाच्या धमक्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---