भारत आणि दक्षिण (ICC womens world cup final INDW vs SAW) आफ्रिका यांच्यातील आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025चा अंतिम सामना रविवार, 2 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा रोमांचक सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होईल.
सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला, तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत करत अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली आहे.
दोन्ही संघ आपापला वर्ल्ड कप खिताबी दुष्काळ संपवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे हा सामना अत्यंत थरारक आणि रोचक ठरण्याची अपेक्षा आहे. आता पाहूया हा सामना तुम्ही घरी बसून फ्रीमध्ये लाईव्ह कसा आणि कुठे पाहू शकता
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला वर्ल्ड कप फायनलचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. टॉस दुपारी 2.30 वाजता होणार आहे. भारतामध्ये या सामन्याचे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर केले जाणार आहे. तर, ज्यांना फ्रीमध्ये सामना पाहायचा आहे, ते डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रसारण पाहू शकतात.
याशिवाय, मोबाईल किंवा लॅपटॉपवर सामना पाहू इच्छिणारे चाहते जिओ सिनेमा आणि हॉटस्टार अॅप किंवा वेबसाईटवरून हा सामना फ्रीमध्ये लाईव्ह पाहू शकतील. यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही.
भारतीय महिला संघ तिसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. यापूर्वी 2005 आणि 2017 मध्ये टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली होती, पण विजेतेपदापासून थोडीशी दूर राहिली. आता या वेळेस, घरच्या मैदानावर इतिहास रचण्याची सुवर्णसंधी भारतीय संघासमोर आहे.






