वेलिंग्टन । न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात बेसिन रिझर्व (Basin Reserve) स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (1st Test Match) न्यूझीलंडने आज(24 फेब्रुवारी) 10 विकेट्सने विजय (Won By 10 Wickets) मिळवला आहे. त्याचबरोबर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (Trent Boult) रविवारी भारताचा कर्णधार विराट कोहलीबद्दल (Virat Kohli) आपले मत व्यक्त केले होते.
यावेळी विराटबद्दल बोलताना बोल्ट म्हणाला की, विराटला लयीत येऊ द्यायचे नव्हते. त्यामुळे बोल्टने विराटविरुद्ध उसळी घेणाऱ्या चेंडूचा वापर केला आणि विराटला बाद केले.
या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराटने 43 चेंडूत 19 धावा केल्या. यानंतर बोल्टचा चेंडूला हुक करण्याच्या प्रयत्नात न्यूझीलंडचा यष्टीरक्षक बीजे वॉटलिंगला झेल देत बाद झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 144 धावा केल्या होत्या. परंतु त्यानंतरही भारतीय संघ न्यूझीलंडच्या धावांपेक्षा 39 धावा पिछाडीवर होता.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराटविरुद्ध वापरलेल्या रणनीतीचा खुलासा करताना बोल्ट म्हणाला की, “भारतीय संघाच्या इतर खेळाडूंप्रमाणे चेंडू थेट बॅटवर येणे हे विराटलाही आवडते. निश्चितच जेव्हा आमच्याकडून काही चूक होते तेव्हा विराट चौकार मारतो. त्यामुळे आमच्या दृष्टीकोनातून आम्ही हे थांबविण्याचा प्रयत्न करत होतो.”
“वैयक्तिकरित्या माझ्यासाठी क्रीझचा वापर करणे आणि आखूड चेंडू फेकण्याची योजना ही चांगली ठरली. त्यामुळे विराटच्या धावा नियंत्रित करण्यास मदत झाली,” असेही बोल्ट यावेळी म्हणाला.
केवळ दुसऱ्यांदाच 'कॅप्टन' कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा झाला 'असा' पराभव
वाचा👉https://t.co/rtdiLgEdpl👈#म #मराठी #cricket #INDvsNZ #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 24, 2020
कसोटी चॅम्पियनशीपमधील टीम इंडियाचा पहिला पराभव; जाणून घ्या किती आहेत गुण
वाचा👉https://t.co/MR3sRkDtuq👈#म #मराठी #cricket #INDvsNZ #TeamIndia #TestChampionship— Maha Sports (@Maha_Sports) February 24, 2020